मी आता निलेशसोबत पुण्यातच राहणार..बायकोच्या विवाहबाह्य संबंधाला वैतागून पतीने केले ‘असे काही’?

शेअर करा

चित्र : सांकेतिक

संसार म्हटले की मतभेद हे आलेच मात्र बायकोच्या विवाहबाह्य संबंधाला वैतागून पतीने आत्महत्या केल्याची घटना तशी दुर्मिळच मात्र महाराष्ट्रातील अमरावती इथे हा प्रकार घडला असून मृतकाच्या १८ वर्षीय मुलीच्या तक्रारीवरुन आई व तिच्या प्रियकराविरुद्ध शुक्रवारी बडनेरा पोलिसांनी कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे .

पत्नी घरात भांडून प्रियकराचा हात धरून पुणे येथे निघुन गेल्याचा परिणाम पतीच्या मनावर झाला होता.त्यातून पतीची मानसिक स्थिती पार ढासळून गेली होती. बायकोला फोनवर समजावून देखील वडील कंटाळले होते, मुलीने देखील आईशी बोलून पाहिले मात्र आईवर काही परिमाण झाला नाही त्यातूनच वडिलांनी आत्महत्या केल्याचे मुलीचे म्हणणे आहे .

उपलब्ध माहितीनुसार, निलेश चौधरी ( रा. भुसावळ) असे आरोपीचे नाव असून मृतकाच्या पत्नीसोबत त्याचे अवैध संबंध होते .निलेश व मृताच्या पत्नीचे सतत फोनवर बोलणे असायचे. त्यावरुन पत्नी-पतीमध्ये सतत भांडणे होत होती . १४ मे २०२० रोजी ही महिला प्रियकरासोबत निघून गेली. मी आता निलेशसोबत पुणे इथेच राहणार असून आता कधीही परत येणार नाही, असे तिने मुलीला फोन करून सांगितले. मुलीने आणि वडिलांनी तिला पुन्हा घरी येण्याची विनंती केली मात्र तिने त्यांना जुमानले नाही .

बायको गेल्यानंतर पती अत्यंत एकाकी पडले . बायको परत येण्याची कोणतीही आशा राहिली नसल्याने आपण आत्महत्या करतो, असे वडिलांनी मुलीजवळ अनेकदा बोलून दाखविले. मुलीने वडिलांना असे करु नका, आपण आजीकडे राहू, मी नोकरी करेल.काही काळाने सर्व बरोबर होईल असे सांगून वडिलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र तिचे प्रयत्न अयशस्वी ठरले. अखेर त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी मुलीला मोबाईलवरुन यासंदर्भात मेसेज पाठवून मृत्यूस कवटाळले.


शेअर करा