‘ तो ‘ दुकानात बसून पै पै कमवायचा अन ‘ ती ‘ प्रियकरावर उधळायची मात्र अखेर : कुठे घडली घटना ?

  • by

लॉकडाऊनमुळे विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्याची चांगलीच गोची झालेली आहे . मात्र त्यात देखील काही जण रिस्क घेऊन आपले रिलेशन्स तुटू नयेत म्हणून काळजी घेत आहेत.चोरून लपून भेटणे सुरु असले तरी आता पूर्वीचे दिवस राहिलेले नाहीत मात्र अशा परिस्थितीत देखील रिस्क घेऊन विवाहित असलेल्या आपल्या प्रेयसीला भेटणे एका व्यापाऱ्याला चांगलेच महाग पडले असून महिलेचा पती असलेल्या दुसऱ्या व्यापाऱ्याने भर रस्त्यात त्याची धुलाई केली. घटना उत्तर प्रदेशातील असून रस्त्यावरील लोकांनी देखील ह्या प्रियकरावर चांगलाच हात साफ करून घेतला.

उपलब्ध माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये भररस्त्यात हायव्होल्टेज ड्रामा बराच वेळ सुरु होता. महिलेचा पती आणि तिचा प्रियकर हे दोघेही किराणा व्यावसायिक आहेत. पतीने त्याच्या बायकोला भर रस्त्यात प्रियकरासोबत अश्लील चाळे करताना पाहिले आणि त्याला चोपायला सुरु केले. पतीने पत्नीच्या प्रियकराला भररस्त्यात चपलेने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. प्रियकर मार खात असलेला पाहून इतर लोकांनी देखील प्रियकराला मारहाण केली. घटनेची माहिती कळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी पत्नीसह तिच्या प्रियकराला आणि पतीलाही पोलीस ठाण्यात नेले.

हरबंश मोहालमध्ये राहणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या पत्नीचे (वय ४२) परिसरातच राहणाऱ्या एका व्यापारी तरुणासोबत प्रेमसंबंध होते. पती सातत्याने पैसे कमावण्याच्या मागे असल्याने त्याचे बायकोकडे दुर्लक्ष झाले होते दरम्यान पत्नीचे दुसरीकडे अवैध संबंध सुरु झाले.तिच्या पतीला संशय आला होता. स्थानिकांनीही त्या दोघांच्या प्रेमसंबंधांबाबत व्यापाऱ्याला सांगितले होते. तो त्याच्या पत्नीवर लक्ष ठेवू लागला. पती घरात नसताना ती प्रियकराला घरी बोलावायची आणि ते दोघे फिरायलाही जायचे. बरेच दिवस अशा रीतीने त्यांचे ‘ इलू इलू ‘ सुरु होते .

पतीला त्यांना रंगेहाथ पकडायचे होते त्यासाठी पतीने फिल्डिंग देखील लावली होती. अशातच पतीला एकजणाकडून फीलखाना परिसरात मॉलरोड इथे बायको प्रियकरासोबत रस्त्यावर फिरत असून भर रस्त्यात त्यांचे अश्लील चाळे सुरु असल्याची माहिती समजली. त्याने आपल्या मित्रांच्या मदतीने पत्नी आणि तिच्या प्रियकराला रंगेहाथ पकडले. रंगेहाथ पकडल्यानंतर बायको आणि तो स्पष्टीकरण देत होते मात्र त्याने आणि त्याच्या मित्रानी महिलेच्या प्रियकराला चपलेने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कपडे फाटेस्तोवर त्याला चोपले त्यानंतर पोलीस पोहचले.

धक्कादायक बाब म्हणजे मारामारी होत असताना बायको प्रियकराला पतीपासून वाचवायचा प्रयत्न करत होती. जमाव आल्यानंतर देखील तिने मध्ये येत जमावापासून प्रियकराचा जीव वाचवण्याचा प्रयन्त केला. काही वेळाने पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पत्नी, तिचा प्रियकर आणि तिच्या पतीसह मित्रांनाही पोलीस ठाण्यात नेले. महिलेचा पती आणि प्रियकर हे दोघेही किराणा मालाचे व्यापारी असून दोघांनीही आपापसात झाले गेले प्रकरण मिटवून घेतले आहे.