अनैतिक संबंधातून कोरोनावर लस म्हणून पूर्ण कुटुंबाला फसवून दिले विष : कुठे घडला प्रकार ?

शेअर करा

एकीकडे देशात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव वाढत असताना कोरोनाच्या आडून अनेक गैरकृत्ये देखील उघड होत असून नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार, आरोग्य कर्मचारी बनून आलेल्या महिलांनी ४ जणांना विष दिल्याची माहिती आहे. दिल्लीच्या उत्तरेकडील अलीपूर भागात ही घटना उघडकीस आली आहे .
ह्या घटनेमध्ये होमगार्ड विक्रम, त्याची आई, काका आणि अन्य एक नातेवाईक यांची हत्या करण्याचा प्रयत्न झाला. शेजारील कुटुंबांने या चौघांना जमिनीवर लोळत पडल्याचं पाहून तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र तोवर विष देणाऱ्या महिलांनी तेथून पळ काढला होता.

मात्र पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवली आणि, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने विष देणाऱ्या दोन आरोपी महिलांना पोलिसांनी समयपूर येथून अटक केली आहे. विक्रमच्या प्रेयसीच्या नवऱ्याच्या सांगण्यावरुन कोरोना लसीच्या बहाण्याने चार जणांना विष पाजल्याची कबुली या महिलांनी दिली आहे. रविवारी या महिला दुपारी विक्रम यांच्या घरी पोहचल्या,तेव्हा आम्ही आरोग्य विभागाकडून आलो आहोत अशी बतावणी त्यांनी केली आणि कोरोना लसीच्या बहाण्याने सर्वाना विष पाजले .

विक्रमच्या प्रेयसीचा नवरा हा रमजानपूर भागात राहतो . त्याचे नाव प्रदीप असून प्रदीपच्या सांगण्यावरुन विक्रमच्या संपूर्ण कुटुंबाला विष पाजलं गेल्याचं उघड झालं. ह्या प्रदीपला देखील अटक करण्यात आलेली असून त्याने धक्कादायक खुलासा केला आहे, तो म्हणाला, विक्रम आणि माझी पत्नी दोघांचे अनैतिक संबंध होते. दोघांना अनेकदा समजवण्यात आलं तरीही त्यांनी ऐकलं नाही.यावरुन विक्रमसोबत माझं भांडणही झालं होत त्यानंतर मी त्याला संपवण्याची तयारी सुरु केली आणि अन्य दोन आरोपी महिलांशी संपर्क साधला. दोघांना मोठ्या प्रमाणात पैसे देऊन विक्रमच्या कुटुंबाला विष देऊन मारण्यास तयार केले असा गुन्हा आरोपी प्रदीपने पोलिसांसमोर कबुल केला.


शेअर करा

Leave a Reply