व्हिडीओ कॉल उचलला नाही म्हणून महिलेच्या नवऱ्याच्या मोबाईलवर ‘आक्षेपार्ह ‘ : कुठे घडला प्रकार ?

शेअर करा

बहुतांश लोक स्मार्टफोन हातात आल्यामुळे व्हाट्सएप्पचा वापर करू लागले आहेत. व्हाट्सएप्पवर आपल्या मित्र मैत्रिणींना किंवा नातलगांना कॉल करण्यासाठी बरेच लोक व्हाट्सएप्प व्हिडीओ कॉल या सुविधेचा देखील वापर करतात मात्र व्हाट्सएप्पवर असणाऱ्या महिलांना अशा प्रकारे कॉल करून अश्लील चॅट किंवा व्हिडिओवर आक्षेपार्ह असे दाखवण्याचे देखील प्रकार घडत असून असाच प्रकार बीड जिल्ह्यातील आंबाजोगाई इथे घडला आहे .

उपलब्ध माहितीनुसार, विवाहित महिलेच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने व्हाट्सएप्पवर आक्षेपार्ह असा व्हिडीओ कॉल केला. तो नंबर ब्लॉक केल्यानंतर पुन्हा अन्य नंबरवरून देखील असाच कॉल आला. ही घटना आंबाजोगाई शहरात ८ ते ११ सप्टेंबर या कालावधीत घडली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे .

आंबाजोगाई शहरातील आनंदनगर भागात राहणाऱ्या एका ३२ वर्षीय पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ८ सप्टेंबर रोजी दुपारी ४:४५ वाजता तिच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीने व्हाट्सएप्प कॉल केला मात्र त्यांनी आक्षेपार्ह आढळताच लगेच तो कॉल कट केला मात्र पुन्हा त्या व्यक्तीने तसाच कॉल केला त्यामुळे महिलेने तो नंबरच व्हाट्सएप्पवरून ब्लॉक केला.

पुन्हा ११ सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास अन्य अनोळखी क्रमांकावरून पुन्हा अनोळखी व्हिडीओ कॉल आले. पीडित महिलेने ते कॉल उचलले नाहीत त्यानंतर रात्री ९ वाजता सदर महिलेच्या पतीच्या मोबाईलवर त्याच नंबरवरून आक्षेपार्ह असे फोटो पाठवण्यात आले. अखेर त्या महिलेने आंबाजोगाई शहर पोलीस ठाणे गाठून याबद्दल तक्रार नोंदवली.

आंबाजोगाई पोलिसांनी महिलेने दिलेल्या माहितीवरून त्या नंबरच्या मोबाइलधारकावर विनयभंग आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक सिद्धार्थ गाडे प्रकरणाचा तपास करत आहेत . अनोळखी असलेल्या ठिकाणी मोबाईल रिचार्ज करणे तसेच सहज कुणाशी देखील आपला नंबर शेअर करणे अशा गोष्टीने महिलांचे नंबर अशा लोकांच्या हाती लागतात आणि त्यातून असे प्रकार घडतात . काही दिवसापूर्वी महिलांचे नंबर विकणाऱ्या टोळीस देखील देशात अटक करण्यात आली होती त्यामुळे येत्या काळात महिलांनी नंबर शेअर करतेवेळी काळजी घेणे गरजेचे आहे.


शेअर करा