खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिकावर प्राणघातक हल्लाप्रकरणी भाजपच्या माजी महापौराला अटक : महाराष्ट्रातील बातमी

शेअर करा

राज्यातील सत्ता गेली तरी भाजपच्या नेत्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना त्याची जाणीव झालेली दिसत नाही. आताच आलेल्या बातमीनुसार,जळगाव येथील भाजपचे माजी महापौर व भाजप नगरसेवक ललित कोल्हे यांना खंडणी मागत पिस्तूलाचा धाक दाखवून बांधकाम व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. खंडणीवरून मारहाण केल्याच्या घटनेनंतर ललित कोल्हे हे फरार होते मात्र त्यांना पकडण्यात अखेर पोलिसांना यश आले. कोल्हेच्या अटकेनं राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे .

बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्यावर 16 जानेवारी 2020 रोजी प्राणघातक हल्ला झाला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये देखील हा सर्व प्रकार रेकॉर्ड झाला होता. ह्या प्रकरणात आतापर्यंत ६ जणांना अटक करण्यात आली आहे .

काय आहे प्रकरण?

खुबचंद साहित्या यांच्या मुलाच्या नावावर असलेली महागडी चारचाकी त्यांनी माजी महापौर ललित कोल्हे यांना दिली होती. ही चारचाकी परत मागितल्यानंतर कोल्हे यांनी देण्यास टाळाटाळ तर केलीच मात्र साहित्या यांच्याकडून खंडणी मागितली होती. 16 जानेवारी 2020 रोजी रात्री साडे आठ वाजता शहरातील गोरजाबाई जिमखाना येथे साहित्या गेले असता यावेळी ललित कोल्हे यांच्यासह पाच-सहा जणांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होती. पिस्तूलचा धाक दाखवत लाकडी दांड्याने मारहाण करून हत्येचा प्रयत्न केला होता.

या घटनेनंतर ललित कोल्हे फरार झाले मात्र स्थानिक गुन्हे शाखेचे कोल्हेंच्या हालचालीवर लक्ष होते. ललित कोल्हे हे रामानंदनगर परिसरात आल्याच्या माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून कोल्हे यांना ताब्यात घेतलं. रात्री 11 वाजेच्या सुमारास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांची शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत रवानगी करण्यात आली.

संबंधित बातम्या

महिला मित्रासोबत रंगेहाथ धरले जाऊ नये म्हणून बाल्कनीतून मारली उडी : भाजपच्या नेत्याचा प्रताप
https://nagarchaufer.com/?p=89

लॉकडाऊनदरम्यान सर्रास सुरु होते मसाज पार्लर,पोलिसी कारवाईत आठजण रंगेहाथ धरले : कुठली बातमी ?
https://nagarchaufer.com/?p=56

मोलकरणीशी अनैतिक संबंधाकरिता आईवडील बहीण आणि बायकोलाही संपवले : कुठे घडला प्रकार ?
https://nagarchaufer.com/?p=51

अनैतिक संबंधातून कोरोनावर लस म्हणून पूर्ण कुटुंबाला फसवून दिले विष : कुठे घडला प्रकार ?
https://nagarchaufer.com/?p=20

लॉकडाऊनमुळे भावी पतीचा विरह सहन होत नसल्याने नवरीने पायी गाठले भावी पतीचे घर : पुढे काय झाले ?
https://nagarchaufer.com/?p=80

फक्त इनर वेअर घालून कोरोनाच्या उपचारात गुंतलेल्या एका नर्सचा फोटो तुम्हाला आलाय काय ? : सत्यपरिस्थिती काय ?
https://nagarchaufer.com/?p=131

बलात्कार करून तब्बल सात वर्षे देत होता पोलिसांना गुंगारा, मात्र ‘ ह्या ‘ चुकीने आला पोलिसांच्या जाळ्यात
https://nagarchaufer.com/?p=146

भाडेकरू म्हणून आली अन मालकीण बनली पण तरीदेखील होता पैशांचा हव्यास : उचलले धक्कादायक पाऊल
https://nagarchaufer.com/?p=198


शेअर करा