लॉकडाऊनमुळे लग्न लांबणीवर पडल्याने तरुणीने घेतला ‘ धक्कादायक ‘ निर्णय

शेअर करा

कोरोनाच्या थैमानामुळे देशात काही ठिकाणी लॉकडाऊन तर काही ठिकाणी जनता कर्फ्यू असे नाव देऊन चाललेला लॉकडाऊन अशी परिस्थिती आहे. लॉकडाऊनमुळे विवाह करणे देखील अवघड झाले असल्याने तसेच मोजकेच लोक असल्याने विवाह समारंभात देखील पूर्वीसारखी मौज मस्ती राहिलेली नाही त्यामुळे कोरोना संकट जाईपर्यंत बहुतांश विवाह पुढे ढकलले जात आहेत मात्र त्यामुळे विवाहास इच्छुक अशा तरुण-तरुणीची मात्र निराशा होत असून अशाच एका प्रकारातून एका तरुणीने आत्महत्या केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे . ठाणे येथील ही घटना असून विरार पूर्व इथे ही घटना घडली आहे .

उपलब्ध वृत्तानुसार, विरार पूर्वकडील फुलपाडा चौक परिसरातील गांधी चौक इथे राहणाऱ्या २६ वर्षीय तरुणीने लॉकडाऊनमुळे लग्नास विलंब होत असल्या कारणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी घडली आहे . विरार पोलिसांनी या प्रकारणी आकस्मिक मृत्यूची नोंद केलेली आहे .

विरार पूर्वकडील फुलपाडा चौक परिसरातील गांधी चौक इथे दामोदर इन्क्लेव्ह इथे प्रणाली मधुकर नरवणकर ( वय २६ ) हिचा उन्हाळ्यात विवाह ठरवण्यात आला होता पण त्याच काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि देशभर लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. या लॉकडाऊनमुळे प्रणालीचे लग्न लांबणीवर पडले त्यामुळे ती नैराश्यात होती. याच नैराश्यातून तिने रविवारी सकाळी ११ वाजता खिडकीला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे .


शेअर करा