AU कोण आहे ? भाजप नेत्यांनी रियाच्या तोंडातून ऐकावे

शेअर करा

गेल्या काही वर्षांपासून जनतेला मुळ मुद्द्यापासून भटकवण्याच्या उद्देशाने जुनी प्रकरणे उकरून काढत त्यातच नागरिकांचे लक्ष वळवण्याचे काम भाजपच्या नेत्यांकडून केले जात आहे. सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात तब्बल अडीच वर्षांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात एन्ट्री केली असून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रिया चक्रवती हिला आदित्य ठाकरे यांचे 44 वेळा फोन आले होते असा दावा केलेला आहे. विशेष म्हणजे चक्रवतीच्या मोबाईल फोनमध्ये येऊन AU नावाच्या व्यक्तीचा नंबर सेव होता हा व्यक्ती कोण आहे याचा शोध पोलिसांनी घ्यावा असे त्यांनी म्हटले होते.

पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी रिया चक्रवर्तीची मुलाखत घेतली होती त्यावेळी तिने AU नावाचा व्यक्ती कोण आहे यासंदर्भात खुलासा केला होता. राजदीप सरदेसाई यांनी तिला दुसऱ्यांदा विचारले त्यावेळी तिने AU कोण आहे या संदर्भात स्पष्टीकरण दिले होते. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होतो आहे.

रिया चक्रवर्ती बोलताना म्हणते की, ‘ सध्या सुरू असलेल्या चर्चाचे उत्तर माझ्याकडे नाही. माझ्यावर होत असलेल्या अनेक आरोपापैकी हा एक आरोप आहे . माझी एक मैत्रीण आहे अनाया उदास तिचा नंबर माझ्याकडे AU नावाने सेव आहे पण याचा अर्थ हे सगळे आदित्य उद्धव असे म्हणत आहे. आम्ही त्यावर स्पष्टीकरण दिलेले आहे मात्र तरीदेखील वारंवार हा मुद्दा चर्चिला जात आहे. आदित्य ठाकरे यांना मी कधी पाहिलेले देखील नाही किंवा फोनवर देखील त्यांच्याशी बोलले नाही, असे देखील या व्हिडिओमध्ये बोलताना दिसून येते.


शेअर करा