लग्नानंतर १७ दिवसातच ‘ त्या ‘ नवविवाहितेने बाळाला जन्म दिल्याने प्रकरण गेले पोलिसात अखेर .. : कुठे घडली घटना ?

शेअर करा

लग्नानंतर चक्क १७ दिवसातच त्या नवविवाहितेने बाळाला जन्म दिला यावरून महिलेच्या सासरच्या लोकांना आपली मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात आले तसेच विवाहित महिलेच्या चारित्र्यावर देखील सासरच्या मंडळीत शंका निर्माण झाली. आपला संसार तुटणार हे लक्षात येताच त्या नवविवाहितेने चक्क वडील भाऊ व इतर १० जणांवर तिचे लैंगिक शोषण केल्याचा आळ घेतला. नात्यांना काळिंबा अशी ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली असून अखेर डीएनए चाचणीचा निर्णय घेऊन मग बाळाचे वडील शोधण्यात यश आले.

उपलब्ध माहितीनुसार ,उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात एका गावात महिलेचं लग्न लखनऊमधील बंथरा भागात झालं होतं. लग्नाच्या 17 दिवसानंतर नववधूने बाळाला जन्म दिला. यानंतर मात्र महिलेच्या सासरी मोठी खळबळ उडाली. हे प्रकरण वाढेल या भीतीने नववधूने सख्खा भाऊ आणि वडिलांवर सामूहिक बलात्काराचा आरोप लावला. इतकचं नाही तर महिलेने त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार देखील दाखल केली. या प्रकरणात नंतर प्रकरणात गुंतागुंत वाढत गेली.

वडिल व भावाकडून दुष्कृत्य झाल्याच्या आरोपात सत्य नसल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले मात्र प्रकरणाचा तिढा सुटत नसल्याचे पाहून अखेर डीएनए टेस्ट करण्याचा निर्णय झाला आणि त्यातून दिलीप या तरुणाचे नाव पुढे आले. पोलिसांनी तपास केल्यानंतर आरोपीने सांगितले की पीडित महिला व त्याचे संबंध होते व त्यातून ती गर्भवती राहीली होती मात्र काही दिवसात तिचं लग्न झालं. ती सासरी निघून गेली. आल्यानंतर लगेच १७ दिवसात बाळ झाल्याने परिसरात देखील मोठा चर्चेचा विषय झाला आणि सासरच्या लोकांना खाली पाहण्याची वेळ आली.


शेअर करा