लग्नाआधीचा बायकोचा प्रियकर ‘ अखेर ‘ पतीच्या आला हाती .: पुढे काय झाले ?

शेअर करा

लग्नाआधी बायकोच्या अफेअरची माहिती समजताच संतापलेल्या पतीने प्रियकराचा कोयत्याने वार करून खून केला. पुणे परिसरातील सांगवी इथे ही घटना १३ तारखेला भर दिवसा घडली होती. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या पतीसह दोघांना पुणे पोलिसांनी मावळ परिसरातून अटक केली असून अयाज नुरमोहम्मद शेख ( वय २५, रा. शिवाजीनगर ) व नयन विजय लोंढे ( वय १९ रा. दापोडी ) अशी आरोपींची नावे आहेत .

उपलब्ध माहितीनुसार, आरोपी अयाज शेख याच्या पत्नीचे लग्नापूर्वी मृत सौरभ जाधव (वय २८ रा. दापोडी ) याच्यासोबत अफेअर होते . त्याचा राग मनात धरून आरोपीने मित्रांच्या मदतीने सौरभ याच्यावर वार करून त्यास ठार मारले आणि फरार झाला. सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी अयाज शेख त्याच्या साथीदारांसह वडगाव मावळ इथे त्याच्या एका मित्राकडे लपून बसलेला असून पळून जाण्याच्या तयारीत आहे अशा माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर कारवाई करत पोलिसांनी अयाज नुरमोहम्मद शेख व नयन विजय लोंढे यांना अटक केली .

सौरभ व्यंकट जाधव (वय २८ रा. दापोडी ) असे मृत तरुणाचे नाव असून या प्रकरणात सौरभ याचा भाऊ सुशांत व्यंकट जाधव यांनी फिर्याद दिली होती. सांगवी परिसरात भर दुपारी घडलेल्या ह्या हत्येने परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी विक्रमी वेळेत आरोपीस जेरबंद केल्याने परिसरात पोलिसांचे मोठे कौतूक होत आहे.


शेअर करा