उर्फी जावेद प्रकरणावर रुपाली चाकणकर यांनी सोडले मौन

शेअर करा

उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात सध्या चांगलाच वाद रंगलेला असून यामध्ये आतापर्यंत राज्य महिला आयोगाच्या रूपाली चाकणकर यांनी काही स्पष्ट भूमिका घेतलेली नव्हती त्यावरून त्यांच्यावर सोशल मीडियावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. उर्फी जावेद अंगात घालत असलेले कपडे हे म्हणजे फक्त नंगानाच आहे, अशी टीका भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ यांनी केलेली होती आणि तिच्या विरोधात कारवाईसाठी देखील मुंबई पोलिसांकडे धाव घेतली होती.

रूपाली चाकणकर यांनी या विषयावर मौन सोडताना, ‘ कोणी काय कपडे घालावे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. एखादा पेहराव हा ठराविक व्यक्तींना अश्लील वाटू शकतो पण इतरांना तो अश्लील वाटत नाही त्यामुळे आयोग अशा बाबतीत वेळ वाया घालू इच्छित नाही. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यामुळे कोणी काय कपडे घातले याचा इतिहास काढला खूप मोठी यादी निघेल आणि त्यांना उत्तरे द्यावी लागतील त्यामुळे कपडे परिधान करण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला हवे, ‘ असे देखील चाकणकर पुढे म्हणाल्या.

उर्फी जावेद हिने अनेकदा चित्रविचित्र कपडे घालून फोटो सेशन केले आहे आणि सार्वजनिक ठिकाणी देखील ती त्याच कपड्यात फिरलेली आहे. अशा पद्धतीने तिने वर्तन करू नये असे चित्रा वाघ यांनी म्हटलेले होते. समाजात नग्नता पसरवण्याच्या आरोपाखाली तिला अटक करण्याची देखील मागणी त्यांनी केली होती मात्र उर्फी जावेद हिने जोपर्यंत माझे प्रायव्हेट पार्ट दिसत नाही तोपर्यंत माझ्यावर कारवाई केली जाऊ शकत नाही, असे देखील ठणकावले होते.


शेअर करा