ब्लु फिल्म शौकीन अधिकाऱ्याच्या ‘ तसल्या ‘ कारनाम्यांची बायकोने केली पोलखोल : काय आहे तक्रारीत ?

शेअर करा

लग्न केलेल्या बायकोचा तब्बल सात वर्षे छळ करून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यास बेड्या ठोकण्यात आल्या असून सुमारे सात वर्षे हा प्रकार सुरु होता . पीडित महिलेशी लग्न करावे म्हणून आरोपीने आधी तिच्या मागे तगादा लावला होता. तू लग्न केले नाही तर आत्महत्या करेन, अशी धमकीही आरोपी द्यायचा मात्र प्रत्यक्षात लग्नानंतर मात्र त्याने तिचा अनन्वित छळ केला. नागपूर जिल्ह्यातील वानाडोंगरी येथील ही घटना असून नगरपालिकेचे मुख्याधिकारी भरत बाबुराव नंदनवार आणि त्यांची आई तसेच भाऊ या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी भरत बाबुराव नंदनवार यास अटक करण्यात आली आहे .

त्यांच्या पत्नीने नोंदविलेल्या तक्रारीनुसार, १० एप्रिल २०१२ ते मार्च २०१९ पर्यंत आरोपी भरत नंदनवार यांनी मनमाड, महाबळेश्वर आणि अन्य काही ठिकाणी ब्ल्यू फिल्म दाखवून अनैसर्गिक पद्धतीने शरीर संबंध प्रस्थापित केले. पत्नीने विरोध केला असता आरोपी मारहाण करत असे त्यामुळे पीडितेने अत्याचार निमूटपणे सहन केले. पत्नी गर्भवती असतानादेखील आरोपीच्या विकृतीत काही कमी होत नव्हती त्यामुळे फेब्रुवारी २०१७ मध्ये तिला अपघातही झाला. मात्र अशाही स्थितीत आरोपी नंदनवार पीडित महिलेवर अत्याचार करायचा. आरोपीची आईही त्यालाच साथ द्यायची. पत्नीने विरोध केला असता १५ एप्रिल २०१४ ला आरोपीने घरातून हाकलून देऊन मारण्याची धमकी देखील दिली.

असेच काही दिवस निघून गेल्यावर जुलै २०१४ ला मुलीचा जन्म झाल्यानंतर बल्लारपूर तसेच सिरोंचा येथे मुख्याधिकारी असताना पीडितेवर वारंवार अनैसर्गिक अत्याचार करीत होता. १५ जानेवारी २०१९ ला आरोपी घर सोडून निघून गेला. मार्च २०१९ ला लहान मुलीला एकटे सोडून आरोपी सासू शोभाबाई तसेच पराग नंदनवार यांनीही घरातून पळ काढला. ही बाब फिर्यादीने आरोपी पतीला सांगितली असता त्यांनी तिला घर खाली करून करून निघून जाण्याची धमकी दिली. तसेच नातेवाईकांच्या माध्यमातून घटस्फोट मिळावा म्हणून पीडितेवर दबाव आणला.

डिसेंबर २०१९ मध्ये तर आरोपीने कहरच केला. पिडीतेसोबत घटस्फोट झाला नसतानादेखील अचल नामक महिलेसोबत वर्धमान नगरातील परंपरा सभागृहात डिसेंबर २०१९ मध्ये लग्न केले. अशा रीतीने आपली फसवणूक झाल्यानंतर पत्नीने आरोपी पती नंदनवार, त्याचा भाऊ आणि आईविरुद्ध अंबाझरी ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी प्रदीर्घ चौकशी केल्यानंतर गुरुवारी याप्रकरणी अनैसर्गिक अत्याचार करून छळ करणे, मानसिक त्रास देणे, फसवणूक करणे आदी आरोपांखाली गुन्हा दाखल केला. आरोपी पती नंदनवारला गजाआड करण्यात आले असून अधिक तपास सुरु आहे .


शेअर करा