‘ मी नवरा सोडलाय आता तू बायको सोड ‘ अखेर एक महिना प्लॅन करून प्रियकराने केला ‘ मास्टरप्लॅन ‘ ?

शेअर करा

लग्नाआधी असलेले प्रेमसंबंध लग्नानंतरही सुरु होते मात्र अखेर पती सोडून पहिल्या प्रियकरासोबत संसार थाटलेल्या ह्या विवाहितेचा खून तिच्याच प्रियकराने सुपारी देऊन केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर इथे उघडकीस आली आहे . गोरंबे ( तालुका. कागल ) येथील गीता शिरगावकर या विवाहितेच्या खून प्रकरणी कागल पोलिसांनी पती सागरसह अवघ्या 25 हजारात खुनाची सुपारी घेणाऱ्या निपाणी मधील अन्य तिघांना अटक केली आहे.

न्यायालयाने आरोपींना 25 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. सागर शिरगावकर ( वय 38 राहणार गोरंबे ) , गणेश जासूद ( वय २० ) आकाश पसारे ( वय 29 ), प्रशांत मोरे ( वय 26 ,सर्वजण राहणार निपाणी ) अशी या आरोपींची नावे आहेत निपाणी मधील आरोपींची सागरशी ओळख देणाऱ्या राहुल कोराने याचा शोध सुरू आहे.

सागर आणि आणि गीता यांच्यात लग्नापूर्वीपासून प्रेम संबंध होते दोन्ही कुटुंबातून लग्नाचा प्रस्ताव अमान्य झाल्याने पहिल्यांदा सागरचा विवाह जैन्याळ येथील एका मुलीशी झाला त्यानंतर गीताचा विवाह येथील कोगे येथील एका तरुणाशी झाला. दोघांनाही दोन दोन मुले झाली तरी त्यांच्यात अनैतिक संबंध सुरू होते. या दोघांनी सहा महिन्यापूर्वी नृसिंहवाडी येथे जाऊन विवाह केला. मात्र ‘ मी जसे माझा नवरा आणि आणि मुले सोडून आली तसे तू देखील तुझ्या बायकोला सोड ‘ असा तगादा गीताने लावला.

गीताच्या ह्या नवीन मागणीने सागर आणि आणि त्याची पहिली पत्नी यांच्यात वाद सुरू झाला. ‘ माझ्यासोबतच राहायचे अन्यथा मुलांचे बरे वाईट करेल ‘ अशी धमकीही गीताने सागरला दिली होती. त्यातून सागरने गीताला कायमचे संपवण्याचा निर्णय घेतला आणि निपाणी येथील संशयित आरोपींना 25 हजारांची सुपारी दिली, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक प्रीतम कुमार पुजारी यांनी दिली

असा रचला होता खुनाचा प्लॅन

निपाणी येथील आरोपींना सुपारी दिल्यानंतर सागरने गीताला ‘ तुझ्या इच्छेप्रमाणे मी माझ्या बायकोला सोडतो. मी निपाणी इथे खोली घेतली आहे ‘, असे सांगून तो गीताला मोटरसायकलवर घेऊन निपाणीला आला. आरोपींनी जत्राटवेस परिसरातील निर्जन जागी येण्यास सांगितले होते. काही दिवसासाठी जरा लांब खोली घेतली आहे. असे गीताला सांगून सागर गीताला अंधारात घेऊन आला.तिथे दबा धरून बसलेल्या आरोपींपैकी एकाने तिच्या डोक्यात घाव घातला . मयत झाल्यावर प्रेत तिथेच टाकून ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी प्रेतावर तननाशक मारले तर सागरने कागल पोलिसात येऊन पत्नी गीता रात्री कोणाला न सांगता घरातून निघून गेल्याची फिर्याद दाखल केली.

असे सापडले आरोपी जाळ्यात ?

दोन महिन्यांपूर्वीच हा खून झाला होता त्यासाठी सागरने एक महिन्यापासून तयारी केली होती. गीताचा मोबाईल फोन आपल्याकडे घेऊन त्यात नवीन सिम कार्ड घातले. लोकेशन समजू नये म्हणून सागरने आपला मोबाईल शेतातील घरातच ठेवला. निपाणीला गीताला घेऊन येताना तिचा मोबाईल तिच्याकडे दिला. खुनानंतर निपाणीच्या आरोपींनी हा मोबाईल घेतला आणि आणि बंद करून ठेवला. पोलिसांनी तक्रार देण्यासाठी आलेल्या सागरला गीताकडे मोबाईल असला तर नंबर सांगा असे सांगितले. त्यावर सागर याने तिला सारखे सारखे फोन येतात म्हणून आपण तो नदीत फेकून दिला असे खोटे सांगितले. गीताच्या मोबाईलवर पोलीस फोन करत राहिले. निपाणीतील आरोपींनी प्रकरण मिटले म्हणून फोन सुरू केला आणि जाळ्यात अडकले.


शेअर करा