ज्याला ३२ वार अन ५०० टाके तो घरमालक अन आरोपी चक्क ?

सोशल मीडियावर महाराष्ट्रातील एका खळबळजनक अशा प्रकाराची चांगलीच चर्चा रंगली असून उल्हासनगर येथे ही घटना समोर आलेली आहे . एका घरात आलेला व्यक्ती हा चोर आहे आणि आपले बिंग फुटेल म्हणून चक्क घरमालकावरच तब्बल 32 वार करण्यात आले त्यात त्यांना ५०० टाके देखील पडलेले आहेत आणि वार करणारा व्यक्ती हा घरातील महिलेचा बॉयफ्रेंड असल्याचे समोर आले आहे .

उपलब्ध माहितीनुसार, बंटी वाधवानी असे जखमी झालेल्या घरमालकाचे नाव असून ते उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प येथे त्याची पत्नी आणि मुलांसोबत राहतात . पाच जानेवारी रोजी बंटी हे त्यांच्या पत्नीला एका सत्संगाला सोडण्यासाठी मोटार सायकलवरून गेलेले होते त्यानंतर ते घरी आले त्यावेळी त्यांच्या घरात वेशांतर करून एक माणूस लपून बसलेला त्यांच्या निदर्शनास आला.

बंटी यांच्यावर या व्यक्तीने चाकूने हल्ला केला त्यानंतर ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. परिसरातील नागरिकांनी आरडाओरडा केला त्यावेळी नागरिक घटनास्थळी पोहोचले आणि विठ्ठलवाडी पोलिसांना या प्रकरणी खबर देण्यात आली. पोलीस अवघ्या काही मिनिटात तिथे पोहोचले आणि त्यांनी आरोपी व्यक्तीला बेड्या ठोकल्या.

आरोपीला पोलीस ठाण्यात आणले त्यावेळी त्याचे नाव महेश धारवाणी असे असल्याचे समोर आले. महेश हा बंटी यांच्या पत्नीचा प्रियकर असल्याचा खुलासा बंटी यांनी केलेला असून आपली सासू आणि बायको यांनी मिळून आपल्याला संपवण्यासाठी हा कट रचला होता असे देखील बंटी यांचे म्हणणे आहे. बंटी यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्या शरीरावर 500 पेक्षा अधिक टाके घालण्यात आलेले आहेत तर पोलिसांनी आरोपी महेश धारवाणी याला बेड्या ठोकलेल्या आहेत. पत्नी आणि सासूचा सहभाग असेल त्यांच्याविरोधात देखील कारवाई केली जाईल असेही पोलिसांकडून सांगण्यात आलेले आहे.