औरंगाबादच्या ‘ त्या ‘ तरुणीचाही अखेर मृत्यू , मिठी मारली अन..

काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून स्वतःला पेटवून घेत संशोधक असलेल्या तरुणीला मिठी मारली होती. तरुणाचा त्यावेळीच मृत्यू झाला तर तरुणीवर उपचार सुरू होते मात्र या प्रकारात ती देखील गंभीररित्या भाजलेली होती अखेर ५४ दिवसांनी या तरुणीचा देखील रात्री बाराच्या सुमारास मृत्यू झालेला आहे.

20 नोव्हेंबर 2022 रोजी शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्थेतील बायोफिजिक्स विभागाच्या प्रयोगशाळेत ही घटना घडलेली होती. गजानन खुशालराव मुंडे ( वय 29 जिल्हा परभणी ) असे मयत तरुणाचे नाव असून त्याने पूजा कडूबा साळवे ( वय 28 राहणार दहेगाव तालुका सिल्लोड ) हिला स्वतः पेटून घेत त्यानंतर मिठी मारलेली होती. पूजा ही संशोधक म्हणून शिकत असताना हा प्रकार घडलेला होता.

पूजा हिला तिच्या एका सहकारी महिलेने विभागात बोलावून घेतलेले होते आणि तिच्या पाठोपाठ गजानन हा देखील तिथे आला आणि त्याने बाटलीतील पेट्रोल स्वतःच्या अंगावर ओतून घेतले आणि काही पेट्रोल पूजाच्या देखील अंगावर फेकले. त्यानंतर याने स्वतःला पेटून घेतले आणि प्रयोगशाळेचा दरवाजा बंद करत तिला मिठी मारली . पूजा हिच्यादेखील अंगावर पेट्रोल असल्या कारणाने तिच्या कपड्याने देखील पेट घेतला आणि त्यानंतर तिच्या चेहऱ्याचा आणि डोक्याचा काही भाग जळाला. दोघांनाही दवाखान्यात दाखल करण्यात आले मात्र गजानन याचा अवघ्या काही तासात मृत्यू झाला तर पूजा हिच्यावर उपचार सुरू होते.

पूजा हिने 17 नोव्हेंबर 2022 रोजी बेगमपुरा पोलीस ठाण्यात जाऊन गजानन हा आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार पोलिसात नोंदवलेली होती . पोलिसात याआधी देखील तिने गजानन याच्या विरोधात तक्रारी नोंदवलेल्या होत्या मात्र पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हे नोंदवल्यामुळे आरोपीचे मनोबल वाढत गेले आणि त्याने अखेर केलेल्या या कृत्यात या तरुणीने जीव गमावलेला आहे. पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात बोलावून घेत त्याच्यावर प्रतिबंधात्मक नोटीस बजावली मात्र त्याचा त्याच्यावर काही परिणाम झालेला दिसून आला नाही आणि त्यातून पुढेही धक्कादायक अशी घटना घडलेली होती.

मयत तरुणाने देखील मृत्यूपूर्व जबाब देताना आपले या तरुणीसोबत प्रेम संबंध होते. आम्ही दोघांनी लग्न केलेले असून दोन लाख 50 हजार रुपये आपण या लग्नासाठी खर्च केला मात्र काही दिवसांपासून ती हे लग्न मान्य करण्यासंच तयार होत नव्हती. तिने आपली फसवणूक केली आणि माझे जीवन उध्वस्त केले म्हणून आपण हे टोकाचे पाऊल उचलले असे सांगितले होते. पेटवून घेण्यापूर्वी त्याने एक चिठ्ठी लिहिलेली असून त्यामध्ये सर्व घटनाक्रम लिहिलेला आहे असे पोलिसांनी सांगितले आहे.