अबुधाबीच्या राजघराण्यातील सांगत आलिशान लॉज बुक केलं अन ..

शेअर करा

सोशल मीडियावर सध्या नवी दिल्ली येथील एका प्रकाराची जोरदार चर्चा सुरू असून एका हॉटेल चालकाची बंटी बबली पद्धतीने फसवणूक करण्यात आलेली आहे . अबुधाबी येथील राजघराण्यातील आपण व्यक्ती आहोत असे सांगत या व्यक्तीने दिल्लीतील एका आलिशान हॉटेलमध्ये चार महिने मुक्काम ठोकला होता त्यानंतर त्याचे 23 लाख रुपयांचे बिल झाले आणि तो अचानकपणे गायब झाला.

उपलब्ध माहितीनुसार, मोहम्मद शरीफ असे या भामट्याचे नाव असून लीला पॅलेस हॉटेल व्यवस्थापन यांनी केलेल्या तक्रारीनंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एक ऑगस्ट 2022 रोजी त्याने लीला पॅलेस इथे एक खोली घेतलेली होती त्यानंतर ऑगस्टपासून तर नोव्हेंबरपर्यंत त्याने पैसे दिले नाही आणि त्यानंतर खोलीतील चांदीची भांडी आणि मोत्याचा ट्रे देखील तो घेऊन गायब झाला. आपण व्यवसायासाठी भारतात आलेलो आहोत असे देखील त्याने सांगितले होते त्याच्या राहणीमानावरून तो उच्चभ्र कुटुंबातील असल्याचा दिसायचे त्यावरून हॉटेलच्या कर्मचाऱ्यांची देखील फसगत झाली आणि अखेर त्याने एके दिवशी पलायन केले . पोलीस सध्या त्याचा शोध घेत असून आत्तापर्यंत तो हाती आलेला नाही.


शेअर करा