नाशिकमधील ‘ त्या ‘ तरुणीच्या खुनाचा बापच निघाला मास्टरमाइंड

महाराष्ट्रात एक धक्कादायक असे प्रकरण समोर आलेले असून वडिलांनी ठरवलेल्या ठिकाणी लग्नाला नकार दिल्यानंतर प्रियकरासोबतच लग्न करण्याचा आग्रह धरणाऱ्या स्वतःच्या मुलीचा बापाने गळा आवळून खून केलेला आहे . नाशिक जिल्ह्यातील अंबड परिसरात ही घटना उघडकीला आलेली असून पोलिसांनी आरोपी बापाला ताब्यात घेतलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, रामकिशोर अवधूत प्रसाद भारती असे आरोपी बापाचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे. अंबड एमआयडीसी येथे त्याचा एक छोटासा व्यवसाय असून त्याच्या मुलीचे एका तरुणांसोबत प्रेमसंबंध होते त्यानंतर घरातून विरोध झाल्यावर तिच्या वडिलांनी तिला प्रियकरापासून लांब राहण्याचा सल्ला दिलेला होता मात्र ती ऐकत नव्हती.

मंगळवारी सकाळी आपण घरातून बाहेर जाणार आहोत असे सांगत ती घरातून निघत असताना ती आणि तिचे वडील यांच्या भांडण सुरू झाले त्यानंतर मारामारी झाल्यानंतर तिच्या वडिलांनी तिला घरात बोलावून घेत ओढणीच्या साह्याने गळफास देऊन तिचा खून केला. सुरुवातीला पोलिसांनी हा प्रकार आत्महत्येचा असल्याचे देखील मनाला होता मात्र तपासाला देखील सुरुवात केली होती. शंका आल्यावर पोलिसांनी वडिलाला ताब्यात बापाला ताब्यात घेतले त्यावेळी त्याने आपण हा प्रकार केल्याची कबुली दिलेली आहे.