रावणसोबत चर्चा झाल्यावर बाबाचा नवीन ‘ सुलताना ‘ जुमला

शेअर करा

बागेश्वर येथील श्री धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आवाहन मिळताच दिव्यशक्ती सिद्ध करण्याऐवजी महाराष्ट्रातून काढता पाय घेतला आणि त्यानंतर समाज माध्यमांवर त्याच्याविषयी जोरदार टीका होऊ लागल्यानंतर एक नवीन जुमला उभा केला गेला आहे. महाराष्ट्राबाहेर आयोजित करण्यात आलेल्या या बाबाच्या एका कार्यक्रमात एका सुलताना नावाच्या महिलेने सहभागी होत आपण हिंदू धर्मात प्रवेश करत आहोत असे सांगितले. महाराष्ट्रातून काढता पाय घेण्याची वेळ आल्यानंतर बाबाच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली त्यामुळे बाबाने या महिलेला पुढे करून हिंदू धर्माच्या बुरख्याआड लपण्याचा प्रयत्न केल्याची देखील टीका सोशल मीडियावर केली जात आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आम्ही दैवी शक्तीला आव्हान दिलेले नाही तर बाबाच्या दिव्यशक्ती आणि प्रेत दरबार याला आव्हान दिलेले आहे असे सांगण्यात आलेले आहे.

समाज माध्यमातील दाव्यानुसार सुलताना नावाची महिला ही मुस्लिम असून तिने एका कार्यक्रमात आपण हिंदू धर्मात प्रवेश करत आहोत यासोबतच मुस्लिम धर्माविषयी देखील आपले मत नकारात्मक व्यक्त केलेले आहे त्यावरून वास्तविक गोदी मीडियासाठी तर हा सर्वाधिक मोठा चर्चेचा विषय होता मात्र दुर्दैवाने सुलताना एकाही चॅनलच्या कॅमेऱ्यासमोर ही सुलताना दिसून आली नाही तर तिचे पूर्ण नाव देखील कुणाला माहीत नाही. तिच्या धर्मांतराचा हा प्रकार कितपत खरा आहे यावर देखील शंका व्यक्त केली जात असून बाबाच्या घसरत्या लोकप्रियतेला धर्माचा टेकू लावण्याचा तर हा प्रकार नाही ना ? अशाही चर्चेला ऊत आलेला आहे .

नागपूर येथे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिलेले आव्हान स्वीकारण्याऐवजी धीरेंद्र कृष्ण शास्त्री या महाराजांनी तेथून पळ काढला आणि इतरत्र जाऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीला तुम्हाला चमत्कार दाखवू मात्र तुम्ही इकडे या असे म्हटलेले होते. दिव्यशक्ती जर सगळीकडेच आहे तर या महाराजांची दैवी शक्ती केवळ ठराविक ठिकाणीच का चालते ? असा देखील प्रश्न आता उपस्थित केला जात असून बहुतांश बाबांची अशीच परिस्थिती आहे. देशातील साधी भोळी जनता त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत असल्याने त्यांचे असे फावते आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यास दिव्यशक्ती सिद्ध करण्याचे आव्हान दिले होते. त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी आणि समितीकडून त्यांना तीस लाख रुपये देण्यात येतील असे देखील म्हटलेले होते तसेच त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध केली तर आपले वय 71 वर्ष असून देखील आपण अवघे 26 वय असलेल्या या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या पाया पडू असे सांगत तीस लाख रक्कम ही धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यासाठी जरी कमी असेल तरी कमीत कमी त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करण्यासाठी म्हणून तरी हे आव्हान स्वीकारावे असे श्याम मानव यांनी म्हटलेले होते मात्र त्याआधीच धीरेंद्र कृष्ण शास्त्री याने नागपूर इथून पळ काढला आणि त्यानंतर श्याम मानव यांचे आवाहन आव्हान आपण स्वीकारले असून दुसऱ्या राज्यात जाऊन ‘ तुम्हाला जर दिव्यशक्तीचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही रायपूर येथे या पण नागपूरला दिव्यशक्तीसाठी आम्हाला बोलावू नका , ‘ असेही म्हटलेले आहे.

श्याम मानव यांनी त्याला नागपूर येथे एका बंद हॉलमध्ये आम्ही तुमचे प्रवचन आयोजित करू आणि तुम्ही दुसऱ्या भिंतीआड असलेल्या व्यक्तींची ओळख पटवून द्यावी. जर तुम्ही हे करण्यात यशस्वी झालात तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम सोडून देऊ असे आव्हान दिलेले होते त्यानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी दुसऱ्या राज्यात जाऊन तुम्ही इथे या. तुमच्या येण्या-जाण्याचा खर्च आम्ही करू असे सांगितले होते. धीरेंद्र शास्त्री बाबा याची दिव्यशक्ती ही ठराविक विभागातच काम करते का ? अशी देखील चर्चा आता सोशल मीडियावर सुरू झालेली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही फक्त हिंदू धर्माच्या विरोधात काम करते आहे असे आरोप नेहमीप्रमाणे सुरू करण्यात आलेले असून अंधश्रद्धेचा सर्वाधिक मोठा पगडा हा हिंदू समाजावरच आहे याचे आरोप करणाऱ्यांना भान राहिलेले दिसून येत नाही.


शेअर करा