नगरच्या उड्डाणपुलावर अपघात , वकिलाने गमावले प्राण

नगरच्या एकमेव असलेल्या उड्डाण पुलावर अपघाताचे सत्र काही थांबताना दिसून येत नाही . उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले त्याच दिवशी एक अपघात या पुलावर झालेला होता त्यानंतर या उड्डाणपुलावर बैलगाडी तसेच फेरीवाले यांना मनाई करण्यात आली त्यानंतरही अपघात सत्र थांबत नसून चांदणी चौक ते सक्कर चौक दरम्यान अज्ञात वाहनाने धडक दिल्याने नगर येथील एका वकिलांचा मृत्यू झालेला आहे. .

उपलब्ध माहितीनुसार, अनिरुद्ध टाक ( वय 44 राहणार विनायक नगर) असे मयत वकिलांचे नाव असून शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडलेली आहे . चांदणी चौककडून सत्कार चौकाकडे जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली आणि त्यानंतर या वाहनचालकाने तेथून पळ काढला. नगर येथील उद्योजक हर्जितसिंग वधवा हे तिथून जात असताना त्यांना हा प्रकार दिसल्यानंतर त्यांनी गाडी थांबवली आणि या प्रकाराची पोलिसांना ही खबर दिली.

घटनास्थळीच टाक यांचा मृत्यू झाला असल्याकारणाने ओळख काही केल्या पटत नव्हती त्यानंतर त्यांच्या खिशात वाहन परवाना आढळून आला आणि त्यावरून ते नगर येथीलच रहिवासी असल्याचे देखील समोर आले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटात त्यांच्या कुटुंबाला या प्रकाराची खबर देण्यात आली. त्यांच्या गाडीला जेवणाचा डबा लावलेला असल्याचे देखील लक्षात आल्यानंतर घटनास्थळी असलेल्या व्यक्तींना देखील अश्रू आवरले नाहीत.