श्रीरामपूर इथे बहुरुप्याला आधी दारू मागितली अन ..

नगर जिल्ह्यात एक दुर्दैवी प्रकार श्रीरामपूर येथे उघडकीला आलेला असून बहुरूपी म्हणून काम करत असलेल्या एका व्यक्तीला दारू पिण्यासाठी पैसे देण्यात आले नाहीत म्हणून बेदम मारहाण करण्यात आलेली आहे . शहरातील सरस्वती कॉलनी परिसरात ही घटना उघडकीला आलेली असून शहर पोलीस ठाण्यात दाखल होत बहुरूपी यांनी एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, विजय बबन चव्हाण ( राहणार रामचंद्र नगर शिरसगाव ) हा 17 तारखेला रात्री नऊच्या सुमारास सरस्वती कॉलनी येथे एका ठिकाणी उभा होता त्यावेळी तिथे त्याच्या ओळखीचा असलेला मनोज रावसाहेब चव्हाण हा तिथे आला आणि त्याने त्याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. विजय यांनाच आर्थिक अडचण असल्याकारणाने त्यांनी त्याला पैसे दिले नाहीत म्हणून संतप्त झालेल्या मनोज याने लोखंडी गज विजय यांच्या ओठावर मारून त्यांना जखमी केले . . रक्तबंबाळ झालेले विजय चव्हाण यांनी त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली.