तब्बल इतके कोटी नागरिक बेरोजगार होण्याचा अंदाज ? रिपोर्टने उडवली झोप

देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत असून संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने गेल्या वर्षीच्या तुलनेत परिस्थितीत नकारात्मक बदल होत असून 2023 मध्ये तब्बल 21 कोटी नागरिक देश जगभरात बेरोजगार होण्याची भीती व्यक्त केलेली आहे . येत्या काळात बेरोजगार लोक आणखीन खराब परिस्थितीला सामोरे जातील तसेच गरीब लोक आणखीन गरीब होतील अशी देखील भीती या अहवाला व्यक्त करण्यात आलेली आहे.

अहवालात म्हटल्याप्रमाणे , रशिया युक्रेन युद्धामुळे संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम झालेला आहे त्यामुळे सर्वच देशांनी सध्या कठोर धोरण अवलंबण्यास सुरुवात केलेली आहे . कोरोना काळात असलेल्या लॉकडाऊन चा फटका हा तब्बल 2025 सालापर्यंत जाणवत राहील अशी देखील भीती व्यक्त करण्यात आलेली असून अपारंपारिक क्षेत्रातील रोजगार मात्र काही प्रमाणात वाढतील असे म्हटलेले आहे .