मुले जन्माला घाला अन पगारवाढ मिळवा, भारतातही केली घोषणा

भारतातील वाढती लोकसंख्या हा देशापुढील सर्वात मोठा प्रश्न असून भारतातील राज्य असलेल्या सिक्कीम येथे मात्र वेगळा प्रकार दिसून येत आहे . सिक्कीममध्ये आता मुलाच्या जन्मानंतर महिला कर्मचाऱ्यांना भरघोस पगार वाढ देण्यात येणार असून राज्य सरकारने यासाठी प्रस्ताव तयार केलेला आहे. ज्या महिला कर्मचारी दुसऱ्यांदा आई होतील त्यांना पगार वाढ तर तिसऱ्यांदा आई झाल्यानंतर तिसऱ्या मुलाच्या जन्मानंतर त्यांना दुप्पट पगार वाढ करण्यात येणार आहे.

सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी याबद्दल आपले मत व्यक्त करताना आपण लोकांना अधिक मुले जन्माला घालण्यासाठी प्रोत्साहित केलेले पाहिजे जेणेकरून आपल्या राज्याचा प्रजनन दर वाढेल असे म्हटलेले आहे. सिक्कीममध्ये ग्रामीण पातळीवर काही वर्षात प्रजनन दर कमी झालेला आहे तसेच स्थानिक जमातीची देखील लोकसंख्या कमी झालेली आहे त्यांना अधिक मुलांसाठी आपण प्रोत्साहन देत आहोत, असेही त्यांनी म्हटलेले आहे.