..अन वृद्धाची अक्षरश: कातडी सोलली, दुचाकीस्वार अखेर ‘असा ‘ धरला

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून या व्हिडिओबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. एक दुचाकी स्वार एका वृद्ध व्यक्तीला चक्क फरपटत घेऊन जात असताना एका व्यक्तीने त्यांचा व्हिडिओ शूट केला आणि सोशल मीडियावर शेअर केला. कर्नाटक येथील ही घटना असून अपघातातून हा प्रकार झाल्याचे दिसून येत आहे.

प्राथमिक माहितीनुसार वृद्ध व्यक्ती हा टाटा सुमो गाडीत चाललेला होता तर तरुण हा दुचाकीवर चाललेला होता. त्यांच्यात अपघात झाल्यानंतर हाणामारीपर्यंत प्रकरण गेले त्यावेळी सुमो चालकाने तो पळून जात असताना त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने गाडी थांबण्याऐवजी तशाच पद्धतीने गाडी पुढे पळवली त्यामुळे वृद्ध व्यक्तीच्या अंगावरील कातडी सोलली गेलेली आहे. अखेर एका रिक्षाचालकाने रिक्षा आडवी लावली आणि या दुचाकीस्वाराला चांगलाच चोप देण्यात आला.

कर्नाटकातील बंगळुरू येथे मागदी रोड येथील हा प्रकार असून दुचाकीस्वाराने टाटा सुमोला धडक दिलेली होती त्यावेळी सुमो गाडीतील या वृद्ध व्यक्तीने त्याला थांबण्याची विनंती केली मात्र तो पळून जात होता . वृद्ध व्यक्तीने जिद्द सोडली नाही आणि त्याची गाडी पाठीमागून पकडली मात्र तरी देखील तो वेगाने पुढे गाडी पळवत होता याच दरम्यान एका व्यक्तीने हा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर शेअर केला. आरोपी युवकाच्या विरोधात गोविंद राजनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.