काहीतरी ‘ अलग ‘ करण्याच्या नादात स्कुटीवरच नको ते..

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर औरंगाबाद येथील एका तरुण-तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता. एकमेकांना पेट्रोलच्या टाकीवर बसून प्रियकराला घट्ट मिठी मारत रस्त्याने चुंबन घेत जात असतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर औरंगाबाद पोलिसांनी या प्रियकर प्रेयसीवर कारवाई देखील केलेली होती असाच पुन्हा एक प्रकार उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील समोर आलेला असून प्रेयसी ही धावत्या स्कुटीवर प्रियकराच्या मांडीवर बसून रोमान्स करताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रेमी जोडप्यावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे व्हायरल झालेल्या या व्हिडिओत ती प्रियकराच्या मांडीवर बसून लखनऊच्या रस्त्यावर ट्रॅफिकच्या नियमांचे उल्लंघन करत रोमांस करत चाललेले आहेत. एकमेकांना त्यांनी इतके घट्ट पकडून ठेवले आहे की दोघांमधून वारा देखील जाऊ शकत नाही त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर संताप व्यक्त केला जात आहे.

धावत्या स्कुटी गाडीवर प्रेयसी ही प्रियकराच्या मांडीवर बसलेली असून अधून मधून त्याचे चुंबन देखील घेताना दिसून येत आहे. परिसरातील नागरिकांनी हा प्रकार मोबाईलमध्ये कैद केला आणि सोशल मीडियावर शेअर करून दिला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लखनऊ सेंट्रल झोनचे डीसीपी अपर्ण रजत कौशिक यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिलेले असून या जोडप्याचा शोध घेण्यास सुरुवात केलेली आहे. काही वेळात स्कुटी चालवणाऱ्या या प्रियकराला अटक केली धक्कादायक बाब म्हणजे त्याचीही प्रेयसी अल्पवयीन असून काहीतरी अलग करण्याच्या नादात त्यांनी हा प्रकार केलेला होता.