नगरमधील ‘ डॉग शो ‘ ला जिल्ह्यातून उस्फुर्त प्रतिसाद

शेअर करा

नगर शहरात अहमदनगर कॅनल क्लब यांनी आयोजित केलेल्या डॉग शो ला शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला असून 22 तारखेला सकाळी दहा वाजल्यापासून तर पाच वाजेपर्यंत गंगा उद्यानच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत हा शो आयोजित करण्यात आलेला होता. नगर जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांनी तसेच बहुतांश डॉग मालकांनी या शोला हजेरी लावलेली होती.

शहरातील बहुतांश डॉग मालकांना यासंदर्भात पहिल्यापासून माहिती होती मात्र यावेळी इतरही अनेक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भेट देऊन वेगवेगळे डॉग आणि त्यांचे शो पाहिले. डॉग मालकांसोबत इतरही कुत्रा प्रेमी व्यक्ती लहान मुलांसोबत देखील या ठिकाणी आलेले दिसून आले. लेब्राडोर, गोल्डन रिट्रायव्हर , जर्मन शेफर्ड, पग ,अकिता,हस्की , सेंट बर्नार्ड यांच्यासह अनेक वेगवेगळ्या ब्रीडचे डॉग या शोमध्ये पाहायला मिळाले. नगर शहरात अशा प्रकारच्या शोचे आयोजन याआधी देखील केले जात होते मात्र यावेळी नागरिकांनी देखील या शो ला उस्फुर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले आहे.


शेअर करा