भारत चीनला मागे टाकणार का ? , रघुराम राजन म्हणतात की ..

शेअर करा

केंद्र सरकारकडून भारताची इकॉनॉमी सुधारत असल्याची कितीही दावे करण्यात येत असले आणि अवघ्या काही दिवसात भारत चीनला पाठीमागे टाकेल असे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात जागतिक वृद्धीवर परिणाम करण्याच्या क्षमतेत भारत चीनची जागा घेईल असा विचार करणे हे अपरिपक्वतेचे लक्षण आहे. भविष्यात परिस्थिती बदलू शकते मात्र त्यासाठी वेळ लागेल, असे रिझर्व बँकेचे माझी गव्हर्नर रघुराम राजन यांनी सांगितलेले आहे.

एका पत्रकार परिषदेत बोलताना रघुराम राजन म्हणाले की, ‘ चीनच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था अद्याप खूपच छोटी आहे त्यामुळे भारत चीनची जागा घेऊ शकतो असे म्हणणे हे अपरिपक्वतेचे लक्षण आहे. काळानुरूप स्थिती बदलू शकते मात्र त्यासाठी बराच कालावधी जावा लागेल. भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे तसेच भारताची वृद्धी देखील सुरू आहे, असे देखील ते पुढे म्हणाले.


शेअर करा