गुजरातचे दोन भामटे बीड पोलिसांनी आणले धरून

सोशल मीडियात सध्या कर्ज देणाऱ्या कंपन्यांनी धुमाकूळ घातलेला असून अनेकदा ही कर्जे देण्यासाठी प्रोसेसिंग फी व इतर शुल्क म्हणून रक्कम घेण्यात येते आणि त्यानंतर कर्जाचे कुठलेही प्रकरण पुढे सरकत नाही आणि कर्जाच्या इच्छेने म्हणून गुंतवणूक केलेल्या नागरिकांची फसवणूक होते असेच एक प्रकरण सध्या बीड येथे समोर आलेले आहे.

बीड येथील प्रसिद्ध डॉक्टर रवींद्र माणिक गायकवाड ( राहणार वल्लभनगर ) असे फसवणूक झालेल्या डॉक्टरांचे नाव असून मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल टाकण्यासाठी तुम्हाला 20 कोटी रुपयांचे कर्ज देतो असे आमिष त्यांना दाखवण्यात आलेले होते. टप्प्याटप्प्यात त्यांच्याकडून तब्बल दोन कोटी रुपये उकळण्यात आले आणि त्यानंतर प्रकरण पुढे सरकत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली होती.

गुजरातमधील दहा भामट्यांच्या विरोधात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. आर्थिक गुन्हे शाखेने तपासाला सुरुवात केली त्यानंतर तेराशे किलोमीटर प्रवास करून बीड पोलिसांनी अखेर दोन जणांना बेड्या ठोकलेल्या आहेत. दिलावर वली मोहम्मद कक्कल ( वय 37 राहणार गांधी नगरी कच्छ गुजरात ) आणि इस्माईल शहा बच्चालशा शेख ( राहणार भूज गुजरात) अशी आरोपींची नावे आहेत.