तर ‘ ती ‘ क्रूर आई कधीच जेरबंद झाली नसती , फक्त एक चूक अन..

देशात एक खळबळजनक अशी घटना राजस्थान येथील गंगानगर शहरात उघडकीला आलेली असून एका विवाहित महिलेला तिच्या प्रियकरासोबत मिळून स्वतःच्याच मुलीची हत्या केल्याप्रकरणी बेड्या ठोकण्यात आलेले आहेत. सदर महिलेने प्रियकराच्या मदतीने आपल्या तीन वर्षाच्या मुलीची हत्या केली आणि त्यानंतर तिचा मृतदेह धावत्या ट्रेनमधून फेकून दिला. हिंदू मलकोट पोलीस स्थानकाच्या हद्दीत रेल्वे रुळावर हा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती.

उपलब्ध माहितीनुसार, सदर मुलीची आई हीचे नाव सुनीता असून तिचा प्रियकर असलेला सनी याच्यासोबत तिने हा प्रकार केलेला आहे. शास्त्रीनगर परिसरातील ती रहायला असून तिची तीन मुले तिच्या पतीसोबत राहत होती तर चार वर्षाच्या दोन मुली या सुनीता बरोबर राहत होत्या. मोठी मुलगी चार वर्षांची असून छोटी मुलगी ही तीन वर्षांची होती.

16 जानेवारीच्या रात्री सुनीता हिने तिच्या तीन वर्षाच्या मुलीची गळा दाबून हत्या केली आणि तिच्या प्रियकराला बोलावून घेतले त्यानंतर तिचा मृतदेह चादरीमध्ये गुंडाळला आणि ट्रेनमधून तो एखाद्या नदीत फेकून देण्याचा तिचा विचार होता मात्र मृतदेह नेमका रुळावर पडला आणि त्यानंतर हा प्रकार समोर आला. तपासाचे धागेदोरे आखेर तिच्यापर्यंत आणि तिच्या प्रियकरांपर्यंत आले आणि पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या. अनैतिक संबंधात ही मुलगी आम्हाला अडचण ठरत होती म्हणून आम्ही तिचा खून केला आहे अशी कबुली तिची आई आणि तिच्या प्रियकराने दिलेली आहे.