गर्लफ्रेंड मिळवण्यासाठी काय काय केलं ? , आईला समजलं अन..

आपल्याकडे पैसा रूप सगळं असून देखील आपल्याला गर्लफ्रेंड मिळत नसल्याने परिसरातील इतर महिलांचे मोबाईल नंबर मिळून त्यांना त्रास देणाऱ्या एका बावीस वर्षीय युवकाला मुंबईच्या मालाड पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. काहीही करून गर्लफ्रेंड मिळवायचीच या उद्देशाने त्याने एक डेटिंग ॲप डाऊनलोड केले होते त्यामधून तो महिलांचे आणि मुलींचे फोन नंबर काढायचा आणि त्यावर अश्लील मेसेज आणि व्हाट्सअप कॉल करायचा.

उपलब्ध माहितीनुसार, मालाड परिसरात हा तरुण पाण्याची डिलिव्हरी करण्याचे काम करायचा. आपल्या मुलाला गर्लफ्रेंड नाही त्यामुळे तो सतत डेटिंग अँपवर मुलींच्या शोधात राहतो ही माहिती त्याच्या आईच्या कानी आल्यानंतर आईने पोलिसांकडे त्याच्याबद्दल तक्रार केली आणि पोलिसांनी त्याला अटक केली. मालाड पोलिसांनी त्याचे मोबाईल नंबर आणि लोकेशन याचा तपास केला त्यावेळी तो दिसला अन त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

हर्ष गिंद्रा असे आरोपी तरुणाचे नाव असून आपल्याबरोबर असलेल्या सर्वच मुलांना गर्लफ्रेंड आहेत मात्र मी कोणत्याच मुलीला आवडत नाही असा त्याच्यामध्ये न्यूनगंड होता. आपल्याला एखादी चांगली गर्लफ्रेंड मिळावी या उद्देशाने त्याने वेगवेगळ्या डेटिंग ॲपवर रजिस्ट्रेशन केले आणि त्यातून मुलींचे नंबर मिळवण्याचा त्याला नाद लागला. लग्नाच्या वेबसाईट देखील त्याने या नादापायी सोडल्या नाहीत त्यावर देखील अनेक जणीशी संपर्क करून गर्लफ्रेंड बनण्यासाठी त्याने त्यांना विनंती केली मात्र त्याच्या या विनंतीला फारसा कोणी रिस्पॉन्स दिला नाही त्यामुळे त्याने अश्लील मेसेज पाठवणे सुरू केले.

आरोपी मुलाने सुरुवातीला मेसेज करून पाहिले मात्र त्याला रिस्पॉन्स येत नाही असे लक्षात आल्यावर त्याने व्हॉइस मेसेज बनवून त्यांना पाठवण्यास सुरुवात केली तसेच व्हाट्सअप व्हिडिओ कॉल करून देखील त्यांच्यासमोर आपला चेहरा दाखवण्याचा प्रयत्न केला मात्र अनेक जणींनी याप्रकरणी त्याची दखल घेतली नाही तर काहींनी त्याचा नंबरही ब्लॉक केला. त्यानंतर त्याने वेगवेगळे सिमकार्ड घेतली आणि पुन्हा हाच प्रयत्न करून पाहिला. ट्रू कॉलर वर ज्या पद्धतीने नाव येते त्या पद्धतीने तो त्यांचे नंबर सेव्ह करत होता. त्याचा हा प्रकार त्याच्या आईच्या लक्षात आल्यानंतर आणखीन कोणत्या मोठ्या गुन्ह्यात तो अडकू शकेल या भीतीने त्यांनी पोलिसात तक्रार दिली आणि पोलिसांनी त्याला अटक केली.