गूढ उलगडले..पारनेर तालुक्यातील सात जणांचे नदीपात्रात मृतदेह

शेअर करा

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक दौंड परिसरात उघडकीला आलेली असून एकाच कुटुंबातील सात जणांचे भीमा नदी पात्रात मृतदेह आढळून आलेले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यातील तीन मृतदेह हे लहान मुलींचे आहेत. सदर कुटुंबातील मुख्य व्यक्तीच्या मुलाने प्रेमविवाह केलेला होता त्यामुळे कुटुंबाची बदनामी झाल्याने त्या तरुणाचे वडील आई जावई बहीण आणि त्यांची तीन मुली या सर्वांनी भीमा नदी पात्रात आत्महत्या केली आहे. तरुणाचे वडील हे पारनेर तालुक्यातील निघोज येथे उस्मानाबाद जिल्ह्यातून मोलमजुरी करण्यासाठी आलेले होते.

मोहन उत्तम पवार ( वय ४५ ) , संगिता मोहन पवार, राणी शाम फुलवरे, शाम फुलवरे अशी यातील चार मृत व्यक्तींची नावे तर इतर जण अल्पवयीन आहेत. मंगळवारी 17 जानेवारी रोजी रात्री अकरानंतर वाहनाने निघोज या गावातून सर्वजण निघाले आणि त्यानंतर शिरूर चौफुला रोडवर असलेल्या दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीत भीमा नदीच्या पात्रात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृतदेह आढळून आले. 18 जानेवारी रोजी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर 20, 21 आणि 22 जानेवारी रोजी तीन मृतदेह आढळून आल्याने ही आत्महत्या कि घातपात याविषयी देखील चर्चा सुरु होती मात्र प्राथमिक माहितीनुसार तरी आत्महत्येचा प्रकार दिसून येत आहे.

मयत व्यक्तीचा मुलगा अमोल याने एक विवाहित तरुणी पळवून नेली होती. त्याला त्याचे वडील तिला तिच्या घरी सोडून ये असे सांगत होते मात्र तो ऐकत नव्हता त्यामुळे वडिलांसह अन्य ६ जणांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथील तात्पुरते रहिवासी असलेल्या या कुटुंबाने भीमा नदीत आत्महत्या केली. पती-पत्नी, मुलगी आणि जावई यांच्यासह त्यांच्या 3 मुलींचे मृतदेह भीमा नदीत सापडले होते. 17 जानेवारीच्या रात्री 7 जणांनी भीमा नदीत आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. सदर घटना समोर आल्यानंतर दौंड शहरात खळबळ उडाली आहे.


शेअर करा