भाजपमधीलच एक युनिट पंकजा मुंढेंची बदनामी करतंय : चंद्रशेखर बावनकुळे

शेअर करा

महाराष्ट्रातील मास लीडर म्हणून ओळख असलेल्या पंकजा मुंडे यांना गेल्या काही वर्षांपासून सातत्याने भाजपमध्ये डावलण्यात येत आहे. एकीकडे अशा चर्चा सुरू असतानाच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपमधीलच एक युनिट पंकजा मुंडे आणि पक्षाची बदनामी करत आहे , असे खळबळजनक वक्तव्य केलेले आहे.

बीड येथील एका सभेत पंकजा मुंडे बोलण्यास उभ्या राहिल्या त्यावेळी चंद्रकांत बावनकुळे यांनी त्यांना बसण्यास सांगितले आणि ते स्वतः उभे राहिले होते . प्रसारमाध्यमांनी यावेळी प्रश्न विचारले त्यावेळी उत्तर देताना, ‘ पंकजा ताईंना सन्मानार्थ माझ्यानंतर बोलण्याचा मीच त्यांना आग्रह केला असे म्हटलेले असून पंकजा मुंडे आमच्या राष्ट्रीय नेत्या आहेत. हा त्यांचा अपमान समजणे हे निव्वळ हास्यास्पद आहे. पक्षातीलच काही लोक पंकजा मुंडे यांची बदनामी करत आहेत असे त्यांनी म्हटलेले आहे. व्हिडिओ एडिट करून हा प्रकार करण्यात आलेला असून अशा व्यक्तीच्या विरोधात कारवाई करण्यात केली जाणार आहे, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे .


शेअर करा