श्याम मानव यांच्या जीविताला धोका ? पोलीस बंदोबस्त वाढवला

शेअर करा

दिव्यशक्तीचा दावा करणारा महाराज धीरेंद्र कृष्ण शास्त्री याला दिव्यशक्ती सिद्ध करण्याचे आव्हान अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव यांनी दिलेले होते. त्यांचे आव्हान स्वीकारण्याऐवजी या बाबाने महाराष्ट्रातून पळ काढला आणि त्यानंतर समितीलाच रायपुर येथे येण्याचे आव्हान केलेले होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आव्हानानंतर महाराष्ट्रातून काढता पाय घेणाऱ्या या बाबाच्या भक्तांनी त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर अत्यंत खालच्या पातळीत देखील टीका केलेली होती.

श्याम मानव यांना त्यानंतर जिवे मारण्याच्या धमक्या सुरू झालेल्या असून त्यांच्या सुरक्षित वाढ करण्यात आलेली आहे. त्यांच्यासोबत बंदूकधारी पोलीस तैनात करण्यात आलेले असून नागपूर पोलिसांनी त्यांच्या सुरक्षिततेसाठी कंबर कसलेली आहे. सुरुवातीला त्यांच्यासोबत केवळ दोन सुरक्षारक्षक राहायचे मात्र आता चार बंदूकधारी पोलीस कर्मचारी देखील त्यांना सुरक्षेसाठी देण्यात आलेले आहेत तर भेट घेण्यास आलेल्या प्रत्येक व्यक्तीची देखील पोलिसांकडून तपासणी करण्यात येत आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यास दिव्यशक्ती सिद्ध करण्याचे आव्हान दिले होते. त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी आणि समितीकडून त्यांना तीस लाख रुपये देण्यात येतील असे देखील म्हटलेले होते तसेच त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध केली तर आपले वय 71 वर्ष असून देखील आपण अवघे 26 वय असलेल्या या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या पाया पडू असे सांगत तीस लाख रक्कम ही धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यासाठी जरी कमी असेल तरी कमीत कमी त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करण्यासाठी म्हणून तरी हे आव्हान स्वीकारावे असे श्याम मानव यांनी म्हटलेले होते मात्र त्याआधीच धीरेंद्र कृष्ण शास्त्री याने नागपूर इथून पळ काढला आणि त्यानंतर श्याम मानव यांचे आवाहन आव्हान आपण स्वीकारले असून दुसऱ्या राज्यात जाऊन ‘ तुम्हाला जर दिव्यशक्तीचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही रायपूर येथे या पण नागपूरला दिव्यशक्तीसाठी आम्हाला बोलावू नका , ‘ असेही म्हटलेले आहे.

श्याम मानव यांनी त्याला नागपूर येथे एका बंद हॉलमध्ये आम्ही तुमचे प्रवचन आयोजित करू आणि तुम्ही दुसऱ्या भिंतीआड असलेल्या व्यक्तींची ओळख पटवून द्यावी. जर तुम्ही हे करण्यात यशस्वी झालात तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम सोडून देऊ असे आव्हान दिलेले होते त्यानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी दुसऱ्या राज्यात जाऊन तुम्ही इथे या. तुमच्या येण्या-जाण्याचा खर्च आम्ही करू असे सांगितले होते. धीरेंद्र शास्त्री बाबा याची दिव्यशक्ती ही ठराविक विभागातच काम करते का ? अशी देखील चर्चा आता सोशल मीडियावर सुरू झालेली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही फक्त हिंदू धर्माच्या विरोधात काम करते आहे असे आरोप नेहमीप्रमाणे सुरू करण्यात आलेले असून अंधश्रद्धेचा सर्वाधिक मोठा पगडा हा हिंदू समाजावरच आहे याचे आरोप करणाऱ्यांना भान राहिलेले दिसून येत नाही.


शेअर करा