आम्ही बाळासाहेबांचा फोटो लावतो तुम्ही मोदींचा लावा , उद्धव ठाकरे यांचे आव्हान

शेअर करा

शिवसेना कोणाची हा वाद सध्या कोर्टात चालू असून मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय समीकरणांना ऊत आलेला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, ‘ महाराष्ट्रात निवडणूक जिंकायची असेल तर बाळासाहेबांशिवाय पर्याय नाही हे आजही सत्य आहे. नरेंद्र मोदी यांना देखील ते मान्य आहे त्यामुळे तुम्हाला मी आव्हान देतो . निवडणूक घ्या मात्र आम्ही बाळासाहेबांचा फोटो लावून येतो अन तुम्ही मोदींचा फोटो लावून या आणि मग बघू लोक कुणाला मते देतात ते ? ‘, अशा शब्दात हल्लाबोल केलेला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘ बँकेत पैसा ठेवून विकास होत नाही तो पैसा विकासासाठी वापरला पाहिजे असे मोदी म्हणाले हे भयंकर आहे. ठेवीतील तीस ते चाळीस टक्के रक्कम ही कामगारांचा भविष्य निर्वाह निधी ग्रॅज्युएटी यासाठी ठेवण्याची तरतूद आहे मात्र या ठेवीवर डल्ला मारण्याचा त्यांचा डावअसून मुंबई त्यांना केवळ सोन्याचे अंडी देणारी कोंबडी वाटते मात्र आमच्यासाठी ती मातृभूमी आहे ‘

भगतसिंह कोश्यारी यांच्यावर देखील उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केलेला असून कोश्यारी यांनी राज्यपाल पदावरून दूर होण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. त्यांना फार उशिरा शहाणपण सुचलेले आहे खरंतर या महाराष्ट्रद्रोही लोकांना हाकलून द्यायला तेव्हाच हवे होते ,’ असे देखील त्यांनी म्हटलेले आहे .


शेअर करा