‘ आय ऍम लूजर ‘ स्टेटस ठेवून दरवाजा लावून घेतला अन त्यानंतर ..

शेअर करा

सोशल मीडियावर एका आत्महत्या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरू असून लखनऊ येथील त्रिवेणी नगर परिसरात ही घटना उघडकीला आलेली आहे. ‘ आय एम लूजर आय लॉस्ट माय सेल्फ ‘ असे स्टेटस ठेवून एका व्यक्तीने आत्महत्या केलेली आहे. सदर व्यक्ती हा बँक कर्मचारी असून 19 जानेवारी रोजी रात्री अकराच्या सुमारास या व्यक्तीने वडिलांच्या बंदुकीने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.

उपलब्ध माहितीनुसार, अजय कुमार सिंग ( वय 24 ) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अजय कुमार ज्या बँकेत काम करतो त्या बँकेतील अधिकारी आणि इतर कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. त्रिवेणी नगर परिसरात त्याने त्याच्या राहत्या घरी वडिलांचा परवाना असलेल्या बंदुकीतून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.

पोलिसांनी सदर प्रकरणी माहिती देताना याप्रकरणी अजय कुमार हा कोटक महिंद्रा या खाजगी बँकेच्या एका शाखेत रिकव्हरी एजंट म्हणून काम करत होता . त्याच्यावर कामाचा अतिरिक्त दबाव होता मात्र तो असे काही करेल याचे कुटुंबाला कल्पना नव्हती. घटना घडली त्या दिवशी रात्री अकराच्या सुमारास तो स्वतःच्या खोलीत गेला आणि त्यानंतर एक तासाने खोलीतून गोळीबाराचा आवाज आला. कुटुंबाने धाव घेतली त्यावेळी तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता त्याला दवाखान्यात नेण्यात आले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता असे सांगण्यात आलेले आहे.


शेअर करा