आठवीतच लावणार होते लग्न पण ? , शुभांगी जोगदंड प्रकरणात नवीन माहिती

शेअर करा

महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या नांदेड जिल्ह्यातील शुभांगी जोगदंड हिच्या हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत असून क्रूर पिता आणि भावांनी मामाला सोबत घेत तिची अत्यंत अमानुषपणे हत्या केली होती. पोलीस तपासात शुभांगी हिचे इयत्ता आठवीतच लग्न लावून देण्याचा घाट घरच्या व्यक्तींनी घातलेला होता मात्र शाळेतील शिक्षकांनी तुमची मुलगी हुशार आहे तिला पुढे शिकवा असे सांगितल्याने तिला शिकण्याची संधी देण्यात आलेली होती . शुभांगी हिने मेहनत करून बीएएमएसला ऍडमिशन देखील मिळवले मात्र याच दरम्यान ती एका तरुणाच्या प्रेमात पडली आणि याच प्रकरणात अखेर तिने आपला जीव गमावला.

शुभांगी हिचा बाप जनार्दन जोगदंड याला दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन आपत्य होती. आर्थिक परिस्थिती खराब असल्याकारणाने त्याने शिक्षणाकडे दुर्लक्ष केले आणि मोठ्या मुलीचे लग्न गावातील पोलीस पाटलाच्या घरातच लावून दिले. शुभांगी हीचे देखील लग्न इयत्ता आठवीतच लावण्याचा त्यांचा प्लॅन होता मात्र शुभांगी हुशार असल्याकारणाने तिला नांदेड इथे शिक्षणासाठी ठेवण्यात आलेले होते.

नांदेडच्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात बीएएमएसला तिचा नंबर लागला त्यामुळे कुटुंब देखील खुश होते मात्र याच दरम्यान ती एका तरुणाच्या प्रेमात पडली आणि त्यानंतर तिच्या घरातून विरोध सुरू झाला. वडिलांच्या इच्छेप्रमाणे तिने एका तरुणांसोबत लग्न करण्यास होकार देखील दिला मात्र याच दरम्यान तिच्या आधीच्या प्रियकराने तिचे फोटो होणाऱ्या पतीला दाखवून हे लग्न मोडलेले होते त्यामुळे कुटुंबाची गावात बदनामी झाली मात्र याचा जाब प्रियकराला विचारण्याऐवजी शुभांगी हिचाच तिच्या घरच्यांनी बळी घेतला.


शेअर करा