संगमनेरमध्ये तब्बल ‘ इतके ‘ किलो गोमांस धरलं , आरोपी ताब्यात

शेअर करा

संगमनेर शहराची ओळख काही वर्षांपासून गोमांस कॅपिटल अशी बनत असलेली दिसून येत आहे . पोलिसांकडून अनेकदा कारवाया करण्यात आल्या मात्र तरी देखील शहरातील अवैध कत्तलखाने पूर्णपणे बंद झालेले नाहीत . पोलिसांनी ताज्या केलेल्या कारवाईत तब्बल 900 किलो मांस आणि मांस वाहतूक करत असलेले एक चार चाकी वाहन असा सुमारे चार लाखांचा माल जप्त करण्यात आलेला आहे.

27 तारखेला रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास शिबलापूर रस्त्यावर ही कारवाई करण्यात आलेली असून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात हलीम युसुफ शेख ( वय 46 राहणार भारत नगर संगमनेर मूळ राहणार नाशिक ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश गोलवड यांनी आरोपीच्या विरोधात तक्रार दिलेली आहे .


शेअर करा