जितेंद्र आव्हाड अशोक चव्हाण यांच्यापाठोपाठ ‘ ह्या ‘ जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदाराला कोरोनाची लागण

शेअर करा

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना जमिनीवर काम करणाऱ्या नेत्यांनाच कोरोनाने आपल्या टप्प्यात घेतले आहे. मंत्री जितेंद्र आव्हाड, अशोक चव्हाण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर आता नाशिकच्या राष्ट्रवादीच्या महिला आमदाराला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांची कोरोना टेस्ट नुकतीच पॉजिटीव्ह आलेली आहे .जितेंद्र आव्हाड हे संपूर्ण बरे झाले असून पुन्हा आपल्या कामात सक्रिय देखील झाले आहेत .

नाशिक जिल्ह्यातील ह्या आमदारांसह त्यांच्या कुटुंबातील तिघांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आमदारांच्या कुटुंबातील काहीजण मुंबईला नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी गेले होते. बहीण आणि मुलगी यांचा कोरोना रिपोर्ट बुधवारी पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या संपर्कातील आमदारांचा अहवालही गुरुवारी पॉझिटिव्ह आल्याने, आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली आहे. ह्या आमदारांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सुधारत आहेत .

मुंबई पुणे पाठोपाठ नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कालपर्यंत 1074 वर पोहोचली असून मालेगावात सर्वाधिक रुग्ण आहेत. राज्यात काल दिवसभरात तब्बल 2 हजार 598 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या आता 59 हजार 546 वर पोहोचली आहे.

संबंधित बातम्या

महिला मित्रासोबत रंगेहाथ धरले जाऊ नये म्हणून बाल्कनीतून मारली उडी : भाजपच्या नेत्याचा प्रताप
https://nagarchaufer.com/?p=89

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी घेतलाय योगी आदित्यनाथ यांचा चांगलाच समाचार : पहा काय म्हणाले ?
https://nagarchaufer.com/?p=154

लॉकडाऊनचे नियम फाट्यावर मारत भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार खेळले क्रिकेट : व्हिडीओ व्हायरल
https://nagarchaufer.com/?p=142

देवेंद्र फडणवीस यांच्या केंद्राकडून २८ हजार कोटींच्या दाव्याची महाविकास आघाडीकडून पोलखोल : पॉईंट टू पॉईंट
https://nagarchaufer.com/?p=177

सुजय विखे यांच्या ‘ त्या ‘ वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण : पहा काय म्हणाले ?
https://nagarchaufer.com/?p=181

देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यांची पोलखोल करताच भाजपचा थयथयाट सुरु, कोणी केले तब्बल आठ ट्विट्स ?
https://nagarchaufer.com/?p=188


शेअर करा