नायब तहसीलदाराच्या ‘ लफडेबाजी ‘ ला ब्रेक लागेना अखेर पत्नीने..

शेअर करा

महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना जालना शहरात उघडकीस आलेली असून शहरातील मोती तलावाच्या चौपाटीवरून शनिवारी दुपारी एका महिलेने कौटुंबिक वादातून तलावात उडी घेऊन आत्महत्या केलेली आहे. जयश्री गणेश पोलास असे मयत महिलेचे नाव असून त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या भावाने महिलेचा पती असलेला गणेश पोलास याच्या विरोधात चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेले असून घटनेमागे गणेश याचे विवाहबाह्य संबंध असल्याचे तक्रारदार यांचे म्हणणे आहे. मयत महिलेचा पती चक्क नायब तहसीलदार असल्याचे समोर आलेले आहे.

तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, जयश्री यांचे लग्न 2000 साली गणेश व्यंकटेश पोलास याच्यासोबत झालेले होते. त्यांना 21 आणि 17 वर्षांची दोन मुले देखील आहेत मात्र त्यानंतरही गणेश हे याचे एका परस्त्रीसोबत अनैतिक संबंध आहेत या प्रकरणाची माहिती जयश्री यांना समजली आणि त्यानंतर त्यांनी गणेश यांना वारंवार आपल्या सुखी संसारात असे प्रकरण नको म्हणून त्या महिलेपासून दूर राहण्याचे सांगितले मात्र गणेश यांच्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही.

काही दिवस उलटल्यानंतर या महिलेवरून गणेश यांनी चक्क जयश्री यांना मारहाण करण्यास सुरुवात केली तसेच मुद्दाम त्रासदेखील तो देऊ लागला. अखेर 28 जानेवारी रोजी जयश्री यांनी मोतीतलाव येथे उडी मारली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. चंदनझिरा पोलीस ठाण्यात आरोपी गणेश पोलास याच्या विरोधात कलम 306 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेले आहे .उच्च पदावर कार्यरत असताना अनेकदा चांगला पैसा हाती आल्यावर सुखी संसाराला गृहण लागल्याची अनेक उदाहरणे समोर आलेली आहेत. बहुतांश प्रकरणात हाती पैसा असल्याने पती-पत्नीचे ऐकत नाही आणि त्यातून अखेर दुर्दैवी शेवट होतो असे दिसून येत आहे.


शेअर करा