82 वर्षे वय झालं पण भरवस्तीत ‘असला ‘ धंदा सुरु केला की..

शेअर करा

औरंगाबाद शहर पोलिसांनी मागील आठवड्यात शहरात एका गावठी दारूच्या विरोधात केलेली कारवाई सध्या चांगलीच चर्चेत आलेली असून शहराच्या मध्यवस्तीत हा प्रकार सुरू होता. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणातील मुख्य आरोपी हा तब्बल 82 वर्षांचा असून औरंगाबाद शहरातील दगड गल्ली कुंभारवाडा येथे गावठी दारूचा अड्डा तो चालवत होता. पोलिसांनी तब्बल 1800 लिटर गावठी दारू आणि इतर मुद्देमाल जप्त केला असून आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, शंकर नारायण आचार्य ( वय 82 राहणार सिद्धिविनायक गणपती मंदिराजवळ दगड गल्ली कुंभारवाडा औरंगपुरा ) असे आरोपी व्यक्तीचे नाव असून गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली होती. आरोपी शंकर हा घराच्या तिसऱ्या मजल्यावर गावठी दारूची फॅक्टरी चालवत होता. पोलीस पथकातील कर्मचारी अधिकारी कल्याण शेळके यांच्या पथकाने उपनिरीक्षक गायकवाड, अंमलदार शेख हबीब, विजय निकम, संजय मुळे, संजय गावंडे यांच्या पथकासोबत ही कारवाई केली त्यावेळी आरोपीचे वय 82 वर्षाच्या असल्याचे समोर आले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शंकर आचार्य हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून याआधी देखील त्याच्याविरोधात अशाच स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आपले वय 82 वर्षे झालेले आहे तरीदेखील त्याने गुन्हेगारी वृत्ती अजून सोडलेली नाही मात्र पोलिसांनी देखील या प्रकरणी कठोर कारवाई करत अखेर त्याला ताब्यात घेतलेले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्याकडून साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.


शेअर करा