साईबाबांची युट्युबवर बदनामी , विखे पाटलांपर्यंत प्रकरण गेले अन..

शेअर करा

संपूर्ण देशात साईबाबा यांचे असंख्य भक्त असून साईबाबा यांच्या दर्शनासाठी देशभरातून असंख्य भक्त रोज शिर्डीत येत असतात. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये साईबाबांची आक्षेपार्ह शब्दात बदनामी करण्यात आलेली आहे. शिर्डी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केलेली आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापर्यंत हे प्रकरण गेले आणि त्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

साईबाबा यांच्या समकालीन भक्तांचे वंशज असलेले शिवाजी गोंदकर असे तक्रारदार व्यक्ती यांचे नाव असून त्यांनी गिरधर स्वामी आणि हिरालाल श्रीनिवास काबरा ( राहणार हैदराबाद ) यांच्या विरोधात तक्रार दिलेली असून त्यामध्ये 31 जानेवारी रोजी त्यांना युट्युबवर संशयित आरोपी यांनी प्रसारित केलेला एक व्हिडिओ दिसून आलेला होता त्यामध्ये साईबाबा यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दात माहिती देण्यात आलेली होती.

शिवाजी गोंदकर यांनी तात्काळ ही बाब राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निदर्शनास आणली आणि त्यानंतर विखे पाटील यांनी दिलेल्या सूचनेनुसार शिवाजी गोंदकर यांनी शिर्डी पोलीस ठाणे गाठले आणि धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी संशयित आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवला. पोलीस उपाधीक्षक संजय सातव आणि पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे .


शेअर करा