
महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक असा प्रकार नाशिक इथे समोर आलेला असून एका दोन मुलांच्या घटस्फोटीत आईने परिचयाच्या एका अल्पवयीन मुलाला गोड बोलून आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत त्याला सुरुवातीला दारूचे व्यसन लावले. एकदा तिने त्याला पॉर्न व्हिडिओ दाखवला आणि त्यानंतर आपल्यासोबत असा प्रकार करण्याचे तिने त्याला सांगितले आणि त्यानंतर त्यांच्यात शारीरिक संबंध सुरू झाले. महिलेच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला असून तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगा हा कल्याण येथील रहिवासी असून दहावीत शिकतो. आरोपी महिला दोन मुलांची आई असून तिचा पतीपासून घटस्फोट झालेला असून या महिलेसोबत पीडित मुलाची आत्या राहत आहे. पीडित मुलगा हा आत्याकडे नाशिकला येत असल्याकारणाने त्याची आणि या महिलेची ओळख झालेली होती. आत्या देखील जेव्हा कधी कल्याण येथे या मुलाकडे येत असायची त्यावेळी ही महिला देखील तिच्यासोबत असल्याने ती देखील मुलाच्या कुटुंबाच्या ओळखीची झालेली होती.
पीडित मुलगा आत्याला भेटण्यासाठी नाशिकला जाऊ लागला आणि आत्या कधी घरी नसेल तर तो आत्याची वाट बघत या महिलेच्या सोबत घरात थांबायचा त्यामुळे महिलेची आणि त्याची जवळीक वाढली. एके दिवशी महिलेने त्याला गोड गोड बोलत दारू पाजली आणि बेडरूममध्ये नेत तिने मोबाईलमध्ये काही पॉर्न व्हिडिओ त्याला दाखवले आणि आपल्या आपल्यासोबत असा प्रकार करण्याची त्याला ऑफर दिली. तिने त्याला शारीरिक संबंध कसे ठेवायचे हे शिकवत त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली. धक्कादायक बाब म्हणजे काही काळानंतर तो आपल्यापासून दुरावू शकतो म्हणून या महिलेने चक्क त्याचा व्हिडिओ देखील शूट केला आणि मोबाईलमध्ये त्याला ब्लॅकमेल करण्यासाठी साठवून ठेवला.
आपला लहान मुलगा सातत्याने मोबाईलमध्ये खेळत असतो हे मुलाच्या आईच्या लक्षात आले आणि आईने एके दिवशी त्याचा मोबाईल हाती घेतला त्यावेळी त्यावेळी त्याच्या मोबाईलमध्ये या महिलेसोबत त्याचा आक्षेपार्ह व्हिडिओ आईला दिसला आणि त्यांच्यातील चॅट वाचून तिच्या पायाखालील जमिनीच सरकली. कसेबसे स्वतःला सावरत या मुलाच्या आईने पोलीस स्टेशन गाठले आणि महिलेच्या विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी महिलेला बेड्या ठोकलेल्या असून अल्पवयीन मुलाला भिवंडी शहरातील बालसुधारग्रहात दाखल करण्यात आलेले आहे.