बुरूडगावच्या ‘ त्या ‘ परिवाराला संग्राम जगताप यांची मदत

शेअर करा

नगरचे आमदार संग्राम जगताप हे नागरिकांच्या लहानसहान सुखदुःखात देखील सहभागी होत असल्याचे होत असल्याने नागरिकांमध्ये संग्रामभैया यांचा आपुलकीने आणि आदराने उल्लेख केला जातो. बुरूडगाव येथील एका गरीब कुटुंबाच्या घराला आग लागल्यानंतर संग्राम जगताप यांनी या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना रोख स्वरूपात आर्थिक मदत केलेली आहे. आमदार जगताप यांच्या आर्थिक मदतीमुळे या कुटुंबाला दिलासा मिळालेला असून संग्राम जगताप यांचे या कुटुंबीयांनी आभार मानलेले आहेत.

नगर शहराजवळ असलेल्या बुरूडगाव येथील प्रताप लक्ष्मण पाचारणे यांच्या राहत्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागलेली होती. अत्यंत गरीब कुटुंबातील या परिवाराला हा मोठा आर्थिक फटका होता कारण घरातील अनेक वस्तू यामुळे जळून खाक झालेल्या होत्या. मोलमजुरी करून हे कुटुंब उदरनिर्वाह करत असल्याची माहिती संग्राम जगताप यांना असल्याने त्यांनी तात्काळ बुरूडगाव येथे जाऊन कुटुंबीयांची विचारपूस केली आणि रोख स्वरूपात त्यांना मदतही केली. संग्राम जगताप यांच्या या भेटीने या कुटुंबाला आर्थिक दिलासा मिळाला असून कुटुंबीयांच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आलेले आहेत .


शेअर करा