भावजयीकडे सातत्याने दीर करायचा शरीरसुखाची मागणी..नकार मिळताच ‘ लावली कडी ‘ मात्र …

  • by

नात्याने भावजयी असलेल्या महिलेकडे वारंवार तिचा दीर शरीरसुखाची मागणी करत होता मात्र ती त्याला सातत्याने नकार देत होती. अखेर त्याने भावजय तयार होत नसल्याने तिच्यावर सुरीने प्राणघातक वार करून खून केल्याची घटना रिसे (ता. पुरंदर, जि. पुणे) येथे घडली आहे. खून केल्यानंतर आरोपी दीर मुबारक कादर सय्यद हा फरार झाला असून अद्याप त्याला शोधण्यात यश आलेले नाही .

जेजुरी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिसे येथील आरोपी मुबारक कादर सय्यद हा आपली भावजय शबीरा जैन्नुदिन सय्यद ( वय ४५ ) हिच्याकडे वारंवार शरीरसुखाची मागणी करीत असे. मात्र ती तयार होत नसल्याने आरोपीने (दि.२१ ) रात्री जेवणानंतर घराचे बाहेर भांडी घासत असताना तिला पुन्हा तशाच स्वरूपाची मागणी केली. तिने नकार दिल्याने आरोपीने घराच्या दरवाजाला कडी लावून भावजयीचा हातातील सुरीने शरीरावर सपासप वार करून तिचा खून केला.

खून होत असताना भावजयीने आरडाओरडा केल्यामुळे लोक गोळा होऊ लागल्याने आरोपी तेथून फरार झाला मात्र तोवर दुर्दैवी भावजयीचा मृत्यू झाला होता .या खूनप्रकरणी फिर्याद मयत महिलेच्या मुलगी हसीना नासीर मुलानी हिने जेजुरी पोलीस ठाण्यात दिली आहे. जेजुरी पोलीस ठाण्याचे सपोनि अंकुश माने यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली फरार आरोपीचा शोध घेण्यास दोन पथके रवाना केली आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे