‘ सत्य समोर येईलच ‘ , इगतपुरीच्या हॉटेलमध्ये व्यावसायिकाचा गळफास

शेअर करा

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक अशी घटना नाशिक जिल्ह्यात समोर आलेली असून मुंबईतील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट असलेले चिराग विनोदराय वरैया ( वय 45 ) यांनी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला होता त्यानंतर अटकपूर्व जामीन घेण्यासाठी त्यांची तयारी सुरू असतानाच हा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

इगतपुरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावरून दोन पानांची सुसाईड नोट ताब्यात घेतलेली असून त्यामध्ये आपल्याला या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवलेले असून लवकरच खरे काय ते सत्य समोर येईल असे म्हटलेले आहे. मुलुंड येथे चार्टर्ड अकाउंटंट म्हणून ते काम करत होते त्यानंतर 10 जानेवारी रोजी त्यांच्या विरोधात भांडुप पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. 26 जानेवारी रोजी ते पोलीस ठाण्यात हजर झाले मात्र प्रकृती ठीक नसल्याकारणाने त्यांना दुसऱ्या दिवशी हजर राहण्यास सांगण्यात आलेले होते.

अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून त्यांचे शेवटपर्यंत प्रयत्न सुरू होते मात्र पोलीस कधीही अटक करू शकतात या भीतीने ते इगतपुरी येथील मित्राच्या हॉटेलमध्ये राहिले होते. पोलिसांना लोकेशन समजू नये म्हणून त्यांनी त्यांचा मोबाईल देखील घरीच ठेवलेला होता त्यानंतर ते शनिवारी दुपारी हॉटेलवर पोहोचले आणि चालकाला दोन हजार रुपये दिल्यानंतर आता काही दिवस मला डिस्टर्ब करू नको असे देखील त्यांनी सांगितले सोबतच मी कुठे आहे याची माहिती कुणालाही सांगू नको असे देखील त्यांनी म्हटले होते.

सोमवारी मुंबईकडे येणार आहे असे त्यांनी सांगितले त्यामुळे चालक त्यांना घेऊन जाण्यासाठी आलेला होता मात्र कुठलाही प्रतिसाद मिळाल्याने पोलिसांशी संपर्क करण्यात आला. पोलिसांनी त्यानंतर खिडकीतून आतमध्ये प्रवेश केला त्यावेळी त्यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. जानेवारी महिन्यात तीन जणांची फसवणूक केल्याप्रकरणी बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेच्या विरोधात देखील मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष म्हणजे या व्यवहारात चिराग वरैय्या यांचीच 93 लाखांना फसवणूक झालेली होती आणि त्यांना हे पैसे महिलेकडून घेणे होते मात्र तिनेच त्यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला त्यामुळे ते खचून गेले असे त्यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलेले असून त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांवर शोककळा पसरलेली आहे .


शेअर करा