मनोहर भिडे यांचा चक्क शिवस्मारकाला विरोध , म्हणाले की ..

शेअर करा

आपल्या गरज नसलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकदा चर्चेत आलेले शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर भिडे यांनी चक्क शिवस्मारकाला विरोध केलेला असून आपल्याकडे नको इतके पुतळे झालेले आहेत असे सांगितले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक समुद्रात उभारण्याच्या सरकारच्या निर्णयावर देखील त्यांनी संताप व्यक्त केलेला असून जुन्नर इथे बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलेले आहे.

काय म्हणाले मनोहर भिडे ?

हिंदू म्हणून जगायचं असेल तर शिवाजी संभाजी हे मृत्युंजय मंत्र जपावे लागतील. छत्रपती शिवाजी महाराजांनी 289 लढाया तर संभाजी महाराजांनी 134 लढाया लढवल्या. हिंदवी स्वराज्यासाठी सर्वस्व दिले. त्यांचे स्मरण करण्यासाठी मिरवणुका उत्सव सोहळे करून चालणार नाही तर छत्रपती संभाजी हे होकायंत्र समजून त्यांच्या विचारानुसार वागून हिंदुस्तानची धारणा रक्तात बनवण्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न केले पाहिजे.संभाजी महाराजांचे बलिदान अत्यंत क्लेशदायक असे होते. हिंदुत्वासाठी त्यांनी केलेल्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी यंदाच्या वर्षापासून धर्मवीर बलिदान मास पाळण्याचे आवाहन करणार आहोत या काळात गादीवर झोपणार नाही चप्पल घालणार नाही शुभ कार्याला जाणार नाही याचे पालन सर्व धारकरी व्यक्तींनी करावे असे त्यांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे मनोहर भिडे यांनीच शिवप्रतिष्ठांनची सुरुवात ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या 32 मन सोन्याच्या सिंहासनाच्या आधारे सुरू केलेले असून त्यांच्या या वक्तव्यावर समाजमाध्यमात टीका केली जात आहे. गुजरातमध्ये पुतळे उभारले त्यावेळी गप्प राहणारे मनोहर भिडे यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकाची इतकी का ऍलर्जी आहे ? यावर आता सोशल मीडियात संताप व्यक्त केला जात आहे.


शेअर करा