बारबाला बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई , काय आहे प्रकरण ?

शेअर करा

काही दिवसांपूर्वी पनवेल येथे एका बारमध्ये काम करत असलेल्या बारबालेवर घरी जात असताना घरी सोडण्याचा बहाना करत रिक्षात बसवून एका टेरेसवर घेऊन जात तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचे प्रकरण उघडकीला आलेले होते. सदर प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली होती मात्र एक आरोपी फरार होता. पोलिसांनी त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याची ओळख पटवून त्याला बेड्या ठोकलेल्या आहेत. सुरज मारुती देवडे ( वय 22 राहणार पंचशील नगर नवीन पनवेल ) असे आरोपीचे नाव असल्याची माहिती आहे

उपलब्ध माहितीनुसार, खोपोली येथे एका बारमध्ये काम करणारी महिला रात्रीच्या सुमारास घरी जात असताना तिला नवीन पनवेल देखील एका फडक्या इमारतीत येऊन टेरेसवर तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी पळून गेले होते. पीडित महिलेने पोलिसात तक्रार दिल्यावर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवली होती त्यातील एका आरोपीला या आधीच बेड्या ठोकण्यात आलेल्या असून आणखी एकाला दोन फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास राहत्या घरातून अटक केली आहे.

पीडित महिला ही एका लेडीज बारमध्ये वेटर म्हणून काम करते. अविनाश चव्हाण ( वय 22 ) आणि सुरज देवडे ( वय 21) अशी आरोपी व्यक्तींची नावे असून 30 जानेवारी रोजी मध्यरात्री हा प्रकार घडलेला आहे. खोपोली येथील एका लेडीज बारमध्ये ही महिला वेटर म्हणून काम करते . रविवारी रात्री महिला कामावरून घरी जात असताना ओरियन मॉल इथे थांबलेली होती त्यावेळी रिक्षाचालक तिथे मित्रासोबत आला आणि त्यांनी तिला घरी सोडण्याचा बहाना केला मात्र तिने सांगितलेल्या पत्त्यावर रिक्षा न नेता त्यांनी इतरत्र रिक्षा वळवली आणि तिला एका बिल्डिंगच्या टेरेसवर नेले.

टेरेसवर नेल्यानंतर दोघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि त्यानंतर तिथून पळ काढला. आपल्यासोबत घडलेल्या या धक्कादायक प्रकारानंतर महिला घाबरून गेली आणि तिने तात्काळ पोलीस ठाणे गाठत दोन आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवला. पोलिसांनी तात्काळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आणि आरोपींची ओळख पटवली आणि त्यांना बेड्या ठोकल्या. महिला सुरक्षेचा प्रश्न महाराष्ट्रात दिवसेंदिवस गंभीर होत असून रात्री अपरात्री कामासाठी बाहेर पडणाऱ्या महिलांना अशा अनेक विकृत लोकांचा त्रास सहन करावा लागतो. मद्यधुंद अवस्थेत रात्री अनेक जण असे फिरत असून पोलिसांकडून गस्त घातली जाते मात्र अपुरे मनुष्यबळ असल्याने पोलिसांच्या देखील कारवाईला मर्यादा येत आहेत.


शेअर करा