नगरच्या महिलेचे दिवसा धर्मांतर अन रात्री अंथरुणात तीन जण घुसले

शेअर करा

महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण सध्या नाशिक जिल्ह्यात समोर आलेले असून मोलमजुरी करणाऱ्या नगर येथील एका 35 वर्षीय महिलेला कामाला लावण्याचे तसेच धर्मांतराचे आमिष दाखवत एका व्यक्तीने तिला महिनाभर घरात डांबून तिच्यावर अत्याचार केलेले आहेत. सदर प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात स्वतःला फादर म्हणणाऱ्या एका व्यक्तीसह पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पीडित महिला ही नगर जिल्ह्यातील रहिवासी असून आपला पती आणि मुलांसह सिन्नर एमआयडीसी येथे कामाच्या शोधात गेलेली होती.

उपलब्ध माहितीनुसार, महिला, तिचा पती आणि तिचे तीन मुले हे कामाच्या शोधात सिन्नर औद्योगिक एमआयडीसी येथे पोहोचलेले होते त्यावेळी तिथे दोन महिलांनी त्यांच्याशी संभाषण केले आणि त्यानंतर त्यांना ‘ तुम्हाला काम देऊ ‘ असे सांगून आरोपी महिलेच्या घरी घेऊन गेले. तिथे भाऊसाहेब दोडके नावाचा ईसम आला आणि त्याने व इतर दोन महिलांनी या कुटुंबाला धर्मांतराचे आमिष दाखवले. कुटुंबीय अडचणीत असल्याने त्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि इतरत्र राहण्याची सोय नसल्याने ते तिथेच थांबले.

आरोपी महिलांच्या घरी राहुल नावाचा एक व्यक्ती आला त्याने आपण फादर आहोत असे सांगत लाल रंगाचे पाणी हे येशूचे रक्त आहे असे सांगत या महिलेला पाजले आणि त्यानंतर एक धार्मिक चित्र असलेले पुस्तक देखील तिला दाखवले. सदर घटना घडली त्याच दिवशी रात्री संशयित आरोपी भाऊसाहेब दोडके आणि राहुल तसेच इतर एका व्यक्तीने देखील या महिलेवर अत्याचार केला. सदर प्रकार कुठे बोलशील तर तुला जिवंत ठेवणार नाही अशी देखील त्यांनी तिला धमकी दिली.

दुसऱ्या दिवशी सकाळी सदर पीडित महिला ही पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तिने आरोपी महिला रेणुका यादव दोडके ( राहणार जोशी वाडी सिन्नर), प्रेरणा प्रकाश साळवे ( राहणार द्वारका नाशिक ), भाऊसाहेब यादव दोडके ( राहणार जोशी वाडी ), फादर राहुल लक्ष्मण आरणे ( राहणार गौतम नगर सिन्नर ) तसेच एक अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. सध्या या चारही जणांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आलेली आहे.


शेअर करा