गावठी कट्टा आहे गोळ्या देता का ? , तोफखाना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नगर शहरात एक वेगळाच प्रकार समोर आलेला असून एक व्यक्ती फोनवर बोलत होता मात्र फोनवरचे त्याचे संभाषण गुप्त सूत्रांच्या माध्यमातून पोलिसांना कळाले आणि त्याला बेड्या ठोकण्यात आल्या . तोफखाना पोलिसांनी ही कारवाई केलेली असून पाच तारखेला कल्याण रोडवरील जाधव पेट्रोल पंपासमोर हा प्रकार घडला होता. गुप्त सूत्रांच्या माध्यमातून पोलिसांना ही माहिती कळाली आणि पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस हेड कॉन्स्टेबल जपे, पोलीस नाईक संदीप धामणे, पोलीस कॉन्स्टेबल सतीश त्रिभुवन यांच्या पथकाने पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, देविदास भिवाजी ढगे ( वय 36 राहणार नगर ) असे आरोपीचे नाव असून फोनवर बोलत असताना तो माझ्याकडे गावठी कट्टा आहे मात्र गोळ्या नाहीत . मला सध्या गावठी कट्ट्यासाठी गोळ्या गरजेच्या आहेत त्या मिळतील का ? असा संवाद फोनवर त्याने साधलेला होता. पाच तारखेला हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले त्यावेळी त्याच्याकडे तीस हजार रुपये किमतीचा देशी बनावटीचा कट्टा आणि 60000 रुपये किमतीची एक दुचाकी असा 90000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे.

माझ्याकडे गावठी कट्टा आहे पण गोळ्या नाहीत तर त्याचा काय फायदा नाही म्हणून मला तुम्ही त्याच्यासाठी गोळ्या देऊ शकता का ? असे देविदास ढगे हा एका व्यक्तीसोबत फोनवर बोलत होता. एका पोलिसांच्या खबऱ्याने ही माहिती तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक असलेल्या ज्योती गडकरी यांना दिली त्यानंतर त्यांनी आरोपीला पकडण्यासाठी तात्काळ सापळा रचला आणि दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांनी त्याला ताब्यात घेतले त्यावेळी त्याच्याकडे गावठी कट्टा आढळून आला. पोलिसांनी त्याच्याविरोधात कारवाईला सुरुवात केलेली असून तो ज्या कुणा व्यक्तीशी बोलत होता त्याचाही तपास सध्या सुरू आहे.