नगर हादरलं..सायकल आडवी लावली म्हणून चाकूने सपासप वार

नगर जिल्ह्यात एक खळबळजनक अशी घटना राहता येथे समोर आलेली असून सायकल आडवी लावली म्हणून झालेल्या किरकोळ वादातून एका वीस वर्षीय युवकाच्या छातीत चाकू खूपसून त्याचा खून करण्यात आलेला आहे. राहता शहरात 15 चारी भागात हा प्रकार घडलेला असून शनिवारी चार तारखेला रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडलेली आहे. आरोपीने हल्ला केला त्यावेळी मध्ये पडणाऱ्या आजी आजोबांना देखील आरोपीने मारहाण केली.

उपलब्ध माहितीनुसार, राहता शहरातील 15 चारी परिसरात इलियास रशीद पठाण ( वय 65 ) यांचे कुटुंब राहत असून ते त्यांचे घरासमोर बसलेले असताना त्यांच्याजवळ राहणारा आरोपी अरबाज शेख आणि एक अनोळखी इसम हातामध्ये चाकू सारखे शस्त्र घेऊन आलेले होते त्यावेळी सायकल आडवी लावली म्हणून त्यांनी रोहित वर्मा या युवकाला त्यांनी काठीने मारहाण सुरू केली. भांडण वाचवण्यासाठी इलियास हे मध्ये पडले त्यावेळी अरबाज शेख याने पठाण यांच्या पत्नीला देखील धक्का दिला आणि इलियास पठाण यांच्या डोक्यात मारहाण केली.

आरोपी यांनी यावेळी जोरदार शिवीगाळ करत आता रोहित याचा मर्डरच करून टाकतो असे म्हणत रोहितला काठीने मारहाण केली आणि रोहित पळून जाऊ लागला त्यावेळी 60 ते 70 फुटावर त्याला आरोपींनी पकडले आणि त्याच्या छातीच्या बाजूला वार करत त्याचा खून केला. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि रोहित याला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा मृत्यू झालेला होता. पोलिसांनी एका व्यक्तीला या प्रकरणात अटक केलेली असून इतर आरोपी मात्र अद्याप फरार आहेत.. पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड या प्रकरणी पुढील तपास करत असल्याची माहिती आहे .