मित्र म्हणून झुलवलं..25 कोटी दे तरच ब्रेकअपच दुःख कमी होईल

सोशल मीडियावर सध्या एका वेगळ्याच प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झालेली असून एका तरुणाने ब्रेकअप केल्यानंतर आपल्या मैत्रिणीवर तब्बल 25 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचा दावा ठोकलेला आहे. सिंगापूर येथील हे प्रकरण असून अचानकपणे या युवतीने आपल्यासोबत मैत्रीसंबंध तोडले त्यामुळे आपण निराशेच्या गर्तेत गेलेलो आहोत असे म्हणत आपल्याला 25 कोटी रुपये मिळाले तर आपली मानसिक स्थिती पुन्हा पूर्ववत होऊ शकेल असे त्याने म्हटलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, के कॉसिगन असे तक्रारदार व्यक्ती यांचे नाव असून मोराटेन असे त्याच्या मैत्रिणीचे नाव आहे. 2016 साली त्यांची प्रथम भेट झाली होती त्यानंतर त्यांच्या भेटीचे रूपांतर मैत्रीत आणि मैत्रिचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र ती त्याला केवळ आपण चांगले मित्र आहोत असे म्हणत होती तर तरुणाचे मात्र तिच्यावर जबरदस्त प्रेम होते. 2020 साली त्यांच्यात वितृष्ठ आले आणि त्यानंतर त्यांची मैत्री संपुष्टात आली. के कॉसिगण याने ७ वर्ष या मैत्रिणीने आपल्याला सतत झुलवत ठेवले आणि त्यानंतर अखेर आपल्यासोबतचे संबंध संपवले त्यामुळे आपण निराशेच्या गर्तेत गेलेलो आहोत असे म्हटलेले आहे.

दोघांमध्ये समुपदेशन करण्यासाठी तरुणी देखील उपस्थित राहिली मात्र त्यानंतर देखील तिने त्याच्यासोबत बोलण्यास नकार दिलेला आहे. माझ्याशी मैत्री ठेवली नाही तर त्याचे तुला गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी त्याने आपल्याला धमकी दिली होती असे के कॉसिगण याने म्हटले आहे तर कॉसिगण याने आपण असे काही बोललोच नाही असे म्हटलेले असून तिने आता मानसिक मनस्ताप दिल्याप्रकरणी आपल्याला 25 कोटी रुपयांची भरपाई दिलीच पाहिजे असे म्हटलेले आहे.