तृतीयपंथी व्यक्तीशी ‘ त्या ‘ युवतीने ठेवले होते संबंध मात्र लग्न जमताच घडले असे की..: कुठे घडला प्रकार ?

  • by

तृतीयपंथी व्यक्तीने एका युवतीचे लैंगिक शोषण करून तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रकार सुरु केला. त्याच्या ह्या प्रकाराला वैतागलेल्या तरुणीने अखेर पोलिसात तक्रार नोंदवली. तृतीयपंथी व्यक्तीने आर्किटेक्ट युवतीला ब्लॅकमेल करून तिचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना नागपूर या उपराजधानीत उघडकीस आली आहे. प्रतापनगर पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी मनीष (वय 32) हा हिंगणामध्ये राहतो तर पीडित 22 वर्षीय युवती ही आर्किटेक्ट आहे. तिची वर्षभरापूर्वी मनीषसोबत गरबामध्ये ओळख झाली. त्यानंतर ते एकमेकांच्या संपर्कात राहत होते . मनीषच्या भाच्याचा वाढदिवस असल्यामुळे त्याने फेब्रुवारीत तिला आपल्या घरी बोलावले. दरम्यानच्या कार्यक्रमात मनीषने तिथे तिची कुटुंबियांशी ओळख करून दिली.

युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार, मनीषच्या घरी भोजन घेतल्यावर तिला झोप येत होती. झोप येत असल्याने मनीषच्या आईने तिला आपल्या मुलीच्या खोलीत झोपण्यास सांगितले. दीड तासानंतर झोपेतून जागे झाल्यानंतर तिला त्रास होत होता. त्यानंतर तिचे मनीष सोबत बोलणे सुरू झाले मग मनीषने तिला प्रपोज केल्यानंतर त्यांच्या मित्रता निर्माण झाली.

त्यानंतर एका दिवशी ती मनीषच्या हिंगणा येथील कार्यालयात गेली. तिथे तुषार घारगे उपस्थित होता. मनीषने तिच्यासोबत शारीरिक संबंध करण्याची इच्छा व्यक्त केली. तिने नकार दिल्यानंतर मनीषने तिला व्हिडिओ क्लिप दाखवली. ही क्लिप त्याने मनीषच्या घरी गेल्यानंतर आणि कोल्ड्रिंक पाजल्यानंतर बनवली होती. क्लिप पाहिल्यानंतर पीडित तरुणीस धक्काच बसला.

त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवल्यानंतरच ती क्लिप डिलीट करील,असे मनीष त्या तरुणीला म्हणाला अन्यथा व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी दिली . अखेर नाईलाजाने तरुणी सहमत झाली आणि त्यानंतर मनीष आपल्या कार्यालयात सेक्स टॉय मदतीने तिच्याशी शारीरिक संबंध करत होता. एप्रिलमध्ये तिला तो तृतीयपंथी असल्याची माहिती मिळाली मात्र तरीही मनीषकडे व्हिडिओ क्लिप असल्यामुळे तिला त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवावे लागले.

काही कालावधीनंतर सदर पीडित युवतीचे लग्न ठरले. युवतीचे लग्न ठरले आहे त्याची माहिती मिळाल्याने मनीष चिडला आणि आणि त्याने तिला तुझे लग्न होऊ देणार नाही अशी धमकी दिली. साखरपुडा झाल्यानंतर मनीष तिच्या होणाऱ्या पतीच्या घरी पोहोचला. त्याने तिच्या होणाऱ्या पतीला फोटो दाखवून आमचे नाते असल्याची माहिती दिली. युवती कुटुंबीयांसोबत त्याला समजावण्यासाठी त्याच्या घरी गेली त्यामुळे चिडलेल्या मनीषने आणि तुषार घारगे यांनी युवती विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला तसेच युवतीने मनीष व त्याच्या साथीदार विरुद्ध प्रताप नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.